HW News Marathi
महाराष्ट्र

“आगे आगे देखो होता है क्या”, गिरीश महाजनांचे सूचक ट्विट

मुंबई | “ठाकरे सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा ही तर फक्त सुरुवात आहे” अशा शब्दात भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांनी सरकारवर निशाणा साधला. “राज्यातील वसुलीबाज ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाच्या दणक्याने राजीनामा द्यावा लागला आहे. ही तर अजून सुरुवात असून पुढे अजून बरीच गैरव्यवहारांची प्रकरणे येणार. आगे आगे देखो…होता है क्या?” असा इशारा महाजनांनी ट्विटरवरुन दिला.

“देशमुखांचा राजीनामा प्रचंड नाचक्कीनंतरचा”

“निगरगट्ट ठाकरे सरकारने पाठराखण केल्याने अनिल देशमुखांना अभय मिळाले होते. अनिल देशमुख यांचा राजीनामा हा प्रचंड नाचक्की झाल्यानंतरचा आणि कोर्टाच्या निर्देशानंतरचा आहे. यामुळे राज्य सरकारच्या गैरकारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.” असा घणाघात गिरीश महाजन यांनी केला.“जे काही समोर आलेय ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे आहे. अजून बरेच काही समोर येणार आहे. या सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरूवात आहे” असा इशारा महाजनांनी दिला.

अनिल देशमुख यांचा राजीनामा

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये सत्यता नाही. मात्र उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्याचा सन्मान ठेवण्याची सरकारची जबाबदारी आहे. सीबीआय चौकशीदरम्यान पदावर राहणे योग्य नाही, अशी भूमिका अनिल देशमुख यांनी पक्षासमोर मांडली.

दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री

गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात राजकारणात आणखी काय ट्विस्ट येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपीला 21 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी’!

News Desk

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत मोदी-सोनिया गांधीची घेणार भेट

swarit

पुन्हा एकदा अजित पवार-देवेंद्र फडणवीस नव्या वर्षात एकाच मंचावर येणार!

News Desk