HW News Marathi
महाराष्ट्र

खुशखबर…१ जानेवारीपासून लागू होणार सातवा वेतन आयोग

मुंबई | सातवा वेतन आयोग १ जानेवारीपासून लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना नव वर्षाची भेट देण्यात आली आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यास राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू येणार आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही नवीन वेतनवाढ लागू होईल. सातव्या वेतन आयोगाचा १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामध्ये शासकीय, जिल्हा परिषद कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, पोलीस, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सातव्या वेतन आयोगामुळे सरकारच्या तिजोरीवर सुमारे २१ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे.

१ जानेवारी २०१९ पासून सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. परंतु फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या पगारात वाढ होणार आहे. तसेच १ जानेवारी २०१६ पासूनची तीन वर्षांची थकबाकी पाच समान हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तसेच सध्या सरकारला कर्मचाऱ्यांना वेतन आणि पेन्शनसाठी ९० हजार कोटींचा खर्च येत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन वाझेंना तात्काळ अटक व्हायला हवीच – देवेंद्र फडणवीस

News Desk

MIMने आपण भाजपा विरोधी असल्याचे कृतीतून सिद्ध करावं! – अतुल लोंढे

Manasi Devkar

मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या, पंतप्रधानांना हातजोडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विनंती

News Desk