HW News Marathi
महाराष्ट्र

सरकारचा SEBC उमेदवारांना दिलासा देणारा निर्णय संपूर्णपणे ‘फसवा’, पडळकरांची टीका

मुंबई | महाविकासआघाडी सरकारच्या मागे एकामागोमाग एक अडचणी येत आहेत असेच चित्र आहे. आणखी एका मुद्द्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. सरकारचा SEBC च्या उमेदवारांना दिलासा देणारा शासन निर्णय संपूर्णपणे ‘फसवा’ असल्याचा आरोप करत आधीच अडचणी आणि निराशाजनक वातावरणात असणाऱ्या विद्यार्थ्यांना खोटा दिलासा देऊन त्यांची फसवणूक केली जाते आहे, अशी गंभीर टीका आणि आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सविस्तर पत्र लिहिलं आहे.

गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

महाविकास आघाडी सरकारने SEBC च्या उमेदवारांसाठी निर्णय घेतला. पण हा निर्णय संपूर्णपणे ‘फसवा’ आहे. एकतर विद्यार्थी आधीच अडचणीत आणि निराशेत आहे. त्यात सरकार खोटे दिलासे आणि आश्वासने देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक करतंय, अशा आरोपांचं खरमरीत पत्र आमदार गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.

पडळकरांच्या पत्रात काय लिहिले आहे?

“शासन आदेशात एक नाही तर अनेक गोष्टींचा घोळ आहे. प्रस्थापितांना भरती प्रक्रियेत जाणीवपूर्वक गोंधळाची स्थिती निर्माण करायची आहे. यामुळेच ही संपूर्ण प्रक्रिया पुन्हा एकदा न्यायलयाच्या कचाट्यात सापडेल आणि महाविकास आघाडीच्या कृतीशुन्यतेला असह्यातेचं नाव देत सरकारला पळवाट मिळेल”, असे गंभीर आरोप पडळकरांनी पत्राच्या माध्यमातून केले आहेत.

“अश्यानं हे सरकार अनेकांना स्वप्निल लोणकर सारख्या दुर्देवी मार्गावर लोटत असल्याचा गंभीर आरोप देखील पडळकरांनी केला. राज्यात असे हजारो स्पप्निल आहेत, ज्यांना धीर देण्याची गरज आहे. पण धीर देण्याऐवजी सरकार अनेकांना स्वप्निल लोणकर सारख्या दुर्देवी मार्गावर लोटत आहे”, असं पडळकर म्हणाले.

 

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं रखडलेल्या नियुक्तांबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. 9 सप्टेंबर 2020 पूर्वीच्या एसईबीसीच्या नियुक्त्या कायम राहणार आहेत. मात्र, स्थगितीनंतर एसईबीसीचा कोणताही लाभ घेता येणार नाही. सगळ्या एईबीसीच्या पदांना ईडब्ल्यूएस किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय असणार आहे. खुल्या प्रवर्गात वर्ग करुन लवकरात लवकर नियुक्त्या देण्याचे आदेश राज्य सरकारने सर्व विभागांना दिले आहेत.

MPSCने SEBCच्या विद्यार्थ्यांनी एक सुधारित परिपत्रक काढलं आहे. त्यानुसार आता MPSCतील SEBC प्रवर्गाच्या जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार आहेत. SEBCच्या जागा खुल्या प्रवर्गात रुपांतरित करुनच आयोग निकाल लावणार आहे. SEBCच्या जागा खुल्या गटात वर्ग करुन आरक्षणानुसार पदसंख्या निश्चित करण्यात आल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिसांच्या आरोग्य रक्षणासाठी मनसेही पुढे सरसावली

News Desk

इंदुरीकर महाराजांबाबत प्रसिद्धी मिळावी म्हणून बोलू नये,चाकणकरांचा तृप्ती देसाईंना टोला..

Arati More

सोशल मिडियावरही बाप्पा मोरया!

News Desk