HW News Marathi
महाराष्ट्र

“राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत?”, गोपीचंद पडळकरांचा सवाल

सांगली | महाराष्ट्रात सध्या शिवसेना आणि भाजप यांच्यात युद्ध जुंपलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात अपशब्द काढल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र नारायण राणेंना त्यातून जमीन मिळाला आहे. या प्रकरणामुळे आता भाजप आणि शिवसेनेचे नेते आमने सामने आले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सामना अग्रलेखातून नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्याला आता भाजप नेते प्रत्युत्तर देत आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही त्यांचं मत आता व्यक्त केलं आहे.

भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत?

गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी एक व्हिडीओ ट्विट करत त्यांचं मत दिलं आहे. “आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? असंतर नाही की राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपीतांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल.

राणे साहेबांवरील सुडाची कारवाई म्हणजे कायद्याची कारवाई असे संबोधता मग पोलिसांना त्यांच्या आई बहिणीवरून अत्यंत घाणरेड्या शब्दात शिव्या घालणाऱ्या वरूण देसाईला अटक का होत नाही? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल…?

ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसी विचारांचा विरोध केला आणि शरद पवारांचे नेहमी मार्मिक शब्दाने पितळ उघड पाडले पण तुम्ही आज त्यांचाच उधोउधो करणे म्हणजे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार नाही का?

हिंदु समाजाला सडलेला म्हणणारा शर्जील उस्मान उजळ माथ्यानं महाराष्ट्रात येऊन फिरतो आणि त्यावर कारवाई करण्याऐवजी सत्तेच्या लालसेपोटी तुमचे हात थरथर कापतात. मला बाळासाहेबांच्या सामनाचे दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर करणाऱ्याला हेच विचारयेचे की त्यावेळेस यांची आस्मिता कुणाच्या पायापुढे लोटांगण घालते.

माननीय संजय राऊत, कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहण्याची विकृतीला बांध घाला अन्यथा ‘तुमच्या हम करे सो’ कायद्याच्या फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील..”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

राऊतांचं सकाळचं प्रवचन ठरलेलं आहे

चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चूक झाकण्यासाठी भाजप नेते नारायण राणेंचं वक्तव्य लावून धरण्यात आलं. केवढ्याला पडलं तुम्हाला? फुग्याला भोक तुमच्या पडलं. आमच्या नाही. आम्ही ‘सामना’च्या अग्रलेखाला किंमत देत नाही. राऊतांचं सकाळचं प्रवचन ठरलेलं आहे. राऊत तुमच्यावर एका महिलेने आरोप केले, तिला जेलमध्ये जायला भाग पाडलं. किती हा सत्तेचा दुरुपयोग, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Aprna

नाशिकमध्ये भाजपला धक्का, २ नेते हाती बांधणार शिवबंधन

News Desk

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर अखेर मुख्यमंत्र्यांची सही, राजीनामा राज्यपालांकडे पाठवणार

News Desk