HW News Marathi
महाराष्ट्र

अर्णब गोस्वामींसाठी राज्यपालांची गृहमंत्र्यांना सूचना, कुटुंबीयांना भेटू देण्याचे दिले निर्देश

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणात भाजपने त्यांना पुर्ण पाठिंबा दिला आणि लवकर त्यांची सुटका व्हावी यासाठी सरकारकडे, कोर्टाकडे मागणीही केली. आता या प्रकरणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी घेतली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करत अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी द्यावी आणि भेटू द्यावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच, अर्णब गोस्वामी यांच्या आरोग्याबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे. त्यामुळे आता गृहमंत्री राज्यपालांचे निर्दश ऐकणार का? हे महत्वाचे असणार आहे.

 

गेले अनेक दिवस भाजप आणि आघाडी सरकारमध्ये अर्णब गोस्वामी यांच्या प्रकरणावरुन वाद सुरु आहेत. तसेच, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातही वाद सुरु आहेत. आता राज्यपालांनी पुन्हा एकदा आघाडी सरकार विरोधात भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण आता कोणत्या वळणावर जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे ! – दादाजी भुसे

Aprna

मुंबई, ठाण्यातही बर्ड फ्ल्यूचा शिरकाव, सरकार हाय अलर्टवर!

News Desk

हर्षवर्धन पाटलांच्या शेजारी अजित पवार बसले ,कारण …

News Desk