HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे पदवीधर शिक्षकसाठी विजयाचा कोटा ठरण्यासाठी रात्रीचे 9 वाजणार…

पुणे | पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रियेला पुण्यातल्या बालेवाडी इथल्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात सुरुवात झाली आहे, या दोन्ही मतदारसंघात निकाल पहिल्या पसंतीच्या मतामध्येच लागणार की पुढील फेऱ्या ची मतमोजणी करावी लागणार याबाबतचे चित्र पदवीधर साठी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तर शिक्षक साठीचे चित्र साधारण सायंकाळी 7 वाजे पर्यत स्पष्ट होऊ शकते अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे….दरम्यान

सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली, सुरवातीला विभागातील पाच जिल्ह्याच्या मतपत्रिका तसेच पोस्टल मत पत्रिका एकत्र करण्यात आल्या, पदवीधर साठी 867 पोस्टल तर शिक्षकसाठी 32 पोस्टल मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत या सर्व मतपत्रिका सरमिसळ करण्याचे काम सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण व्हायला दुपारचे दोन वाजणार आहेत त्यानंतर दुपारी ३ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असून वैध अवैध मत बाजूला करत असतानाच पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाणार आहे.

पदवीधर मतदारसंघासाठी 2 लाख 47 हजार 917 तर शिक्षक साठी 53 हजार19 इतके मतदान झाले आहे…..या सर्व मतपत्रिका एकत्र करून त्यातल्या वैध आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या केल्या जात असतानाच विजयाचा कोटा ठरण्यासाठी रात्रीचे नऊ वाजू शकतात असे विभागीय आयुक्तांनी सांगितले असून जर या प्रक्रियेत एखाद्या उमेदवाराने विजया साठीचा कोटा पूर्ण केला तर शिक्षक चा निकाल साधारण सायंकाळी 7 वाजता तर पदवीधरचा निकाल रात्री ९ वाजता लागू शकतो.पहिल्या पसंतीच्या मतामध्येच विजय मिळवण्यासाठी वैध मतदान भागिले 2, अधिक 1 मत आवश्यक आहे त्यामुळे एकतर्फी निवडणूक झाल्यास रात्री नऊ वाजता निकाल अपेक्षित आहे.

पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण होऊ शकला नाही तर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जाणार आहेत आणि ही प्रक्रिया करण्याची वेळ आल्यास त्याच्या पदवीधर साठी 60 फेऱ्या तर शिक्षक साठी 32 फेऱ्या घ्याव्या लागणार आहेत प्रत्येक फेरीसाठी अंदाजे अर्धा तास वेळ गृहीत धरल्यास निकाल लागण्यासाठी आज रात्री 9 नंतर पुढे 30 तास पदवीधरसाठी लागू शकतात तर शिक्षक साठी 16 तास लागू शकतात असा प्रशासनाचा अंदाज आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय नेत्यांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, घरी राहूनच गुढीपाडवा साजरा करण्याचे आवाहन

swarit

राज्यात काल 3,187 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 49 रुग्णांचा मृत्यू!

News Desk

“गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास…” संजय राऊत यांची मोठी घोषणा!

News Desk