HW News Marathi
महाराष्ट्र

‘पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत करा’, राष्ट्रवादीच्या दोन खासदारांनी घेतली अर्थमंत्र्यांची भेट

नवी दिल्ली। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात पूरग्रस्तांना मदतीसंदर्भात काही मागण्या केल्या आहेत. तर , दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा केला आहे . यावेळी , केंद्राकडून सहकार्य होत असून मदतही मिळेल , अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. केंद्राकडून मदत मिळण्यासाठी राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी अर्थमंत्र्यांची भेट घेण्याचेही सांगण्यात आले होते. त्यानुसार , आज खासदारांनी अर्थमंत्र्यांची भेट घेतली.

खासदार सुनील तटकरे यांनी घेतली भेट

राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी आज केंद्रीय अर्थमंत्र्यांची दिल्लीत भेट घेतली . महाराष्ट्रातील महापुराच्या संकटात विमा कंपन्यांनी व्यापाऱ्यांच छळ थांबवावा आणि राज्याच्या मदतीसाठी केंद्राने तत्काळ निधी मंजूर करावा , अशा दोन मागण्या केंद्रीय अर्थमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे यांच्या मागणीचे पत्रही अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याकडे देण्यात आले आहे.

दरम्यान, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनीही पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करुन केंद्र सरकारकडून मदत मिळवणार असल्याचं राणेंनी म्हटलं होतं. तसेच, मुख्यमंत्र्यांनीही केंद्राकडून भरीव मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून पूरग्रस्तांसाठी मागण्या केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील बेकायदेशीर शाळांवरून नितेश राणेंचा ठाकरे सरकारला सवाल

News Desk

…म्हणून भाजपने कोरोनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे – जयंत पाटील

News Desk

‘या’ कारणामुळे आरोह वेलणकर यांना महेश टिळेकरांनी सुनावले!

News Desk