HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्या वाढदिवशी कसलीही शो-बाजी न करता गरजू विद्यार्थ्यांना मदत करा !

मुंबई | “दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, बालमृत्यूचे तांडव सुरु असताना येत्या १५ जुलै रोजी असलेल्या माझ्या वाढदिवशी कसलीही शो-बाजी, पोस्टरबाजी न करता गरजू विद्यार्थ्यांना, परिसरातील शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना मदत करावी”, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केली आहे. “माझ्या वाढदिवशी मला हारतुरे भेट देण्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या/पुस्तके या स्वरूपात मदत आणावी. अवाजवी खर्च टाळून आपल्या परिसरातील गरजू शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थ्यांना मदत करून माझा वाढदिवस साधेपणाने साजरा करावा. खऱ्या अर्थाने ह्याच माझ्या वाढदिवसाला आपण दिलेल्या शुभेच्छा असतील”, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत आपल्या कार्यकर्त्यांना हे आवाहन केले आहे. “राज्यातील जनतेला विविध समस्येने ग्रासलेले आहे. आजही काही भागात पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या माझ्या माता-बहिणी पावसाची वाट पाहत आहे, शेतकरी बांधव आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. तर दुसरीकडे धरणाचा बांध फुटून कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, बालमृत्यूचे तांडव सुरू आहेत. अशा परिस्थितीत येत्या १५ जुलै रोजी असलेल्या माझ्या वाढदिवशी कसलीही शो-बाजी, पोस्टरबाजी करकर्त्यांनी करू नये ही माझी नम्र विनंती आहे. हारतुरे भेट देण्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या/पुस्तके या स्वरूपात मदत आणावी. अवाजवी खर्च टाळून आपल्या परिसरातील गरजू शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थ्यांना मदत करून माझा वाढदिवस साधेपणाने साजरा करावा. खऱ्याअर्थाने ह्याच माझ्या वाढदिवसाला आपण दिलेल्या शुभेच्छा असतील”, अशी पोस्ट धनंजय मुंडे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री गुलाबराव पाटील थेट गिरीश महाजनांच्या घरी!

News Desk

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन लवकरच सुरू होण्याचे संकेत !

News Desk

मुश्रीफ म्हणाले, मला चंद्रकात पाटलांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, आता फडणवीसांचं उत्तर!

News Desk