HW News Marathi
महाराष्ट्र

पोलिसांची कुठलीही चूक माफ केली जाणार नाही, हेमंत नगराळेंचा इशारा   

मुंबई | मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी काल (१८ मार्च) वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन, मुंबईतील गुन्हेगारीचा आढावा घेतला. यावेळी चांगल्या पोलिसिंगवर भर देण्याबरोबरच, पोलिसांची कुठलीही चूक माफ केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्यात सध्या सचिन वाझे प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी पोलिस आयुक्तांची बदली केल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं.

मुंबई पोलीस दलातील सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील, सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारांबे, सहआयुक्त (प्रशासन) राजकुमार व्हटकर, सहआयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) निकेत कौशिक, वाहतूक विभागाचे सहआयुक्त यशस्वी यादव यांच्यासह सर्व अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त या बैठकीला उपस्थित होते. यावेळी मुंबईतल्या घडामोडींचा आढावा घेत, महिला, ज्येष्ठ नागरिकांसंबंधीत गुन्ह्याबाबत विशेष लक्ष देण्याच्या सूचना यावेळी नगराळे यांनी दिल्या आहेत.

रस्त्यावरील गुन्हेगारी, क्राईम रेट कमी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा. कुठल्याही प्रकरणात कसूर होता कामा नये, छोट्यातली छोटी चूकही सहन केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला. पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच योग्य तपास कसा करावा, याबाबत मार्गदर्शनही केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला सुद्धा हे ‘महाराष्ट्र द्रोही’ ठरविणार का? फडणवीसांचा सवाल

News Desk

शिवसेना अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू राहणार नाही ! मुनगंटीवारांचे सूचक वक्तव्य

News Desk

नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढलेलं दिसतंय, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

News Desk