HW News Marathi
महाराष्ट्र

भीमा कोरेगाव दंगलीपूर्वी झालेला हल्ला हिंदू संघटनांनी केला होता ? समन्वय समितीचा अहवाल

मुंबई: भीमा कोरेगाव दंगलीपूर्वी झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. हिंदू संघटनांनी हा हल्ला केला होता. पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या सूचनेनुसार सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाºया 10 जणांचा समिती स्थापन करण्यात आली होती. त्या ठिकाणी हजर असणाºया पोलीस अधिकाºयाना निलंबित करावे. अशी मागणी कोरेगाव भीमा समन्वय समितीतर्फे शनिवारी करण्यात आली.

तसेच मिलिंद एकबोटे यांनी किमया हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांची तीस डिसेंबरलाच बैठक घेतल्याचे पुरावे समितीकडे उपलब्ध असल्याची माहिती

समोर येतेय . पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगाव इथे सोमवारी (१ जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक आणि जाळपोळीत झाले. सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाºया सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. सणसवाडीतील वादाचे पर्यवसान हाणामारीमध्ये झाले आणि त्यातून अनेक गाड्याची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद अख्ख्या महाराष्ट्रात उमटले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड !

News Desk

शरद पवारांनंतर तुमचं काय स्थान राहील ते विचारावं, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना सवाल

News Desk

भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील! – मुख्यमंत्री

Aprna