HW News Marathi
महाराष्ट्र

कशी होते कोरोनाची चाचणी ? आरोग्य विभागाने केला खुलासा

मुंबई | कोरोनाग्रस्त नेमकी कोण आहेत आणि त्यांची चाचणी कशा प्रकारे होते याबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही. कोरोनाची लागण झालेल्या संशयित व्यक्तीच्या घशातील द्राव घेऊन प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवला जातो. त्यामुळे नागरिकांच्या मनात रक्त तपासणी करण्यावरुन भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे रक्त तपासणीबाबतच्या कुठल्याही चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे. तसेच, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातील ट्विटही केले आहे.

कोरोना संशयितांची रक्त तपासणी करण्याच्या नावाखाली महाराष्ट्रातील काही रुग्णालयांच्या नावांची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने हा महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. ‘राज्यात संशयित रुग्णांची कोरोनासाठी तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रुग्णाचा घशाचा द्राव (‘नसो फॅरिंजीयल स्वॅब’) घेऊन प्रयोगशाळेत पाठवला जातो. यासाठी महाराष्ट्रात सध्या तीन ठिकाणी सुविधा असून मुंबईत कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठवले जातात. काही दिवसांनी ही सुविधा मुंबईतील केईएम रुग्णालय व हाफकीन इन्स्टिट्यूटसह आणखी ४ ते ५ ठिकाणीही करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळं रक्त तपासणीसारख्या अफवांनर लक्ष ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच असून महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ४२ वर पोहोचली आहे. तर भारतात हा आकडा १४७ वर गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे गरजेचे आहे असे लक्षात आले आहे. तरी सरकार त्या दृष्टीने पावले उचलत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मॉल, शाळा, महाविद्यालय अशी गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, गावाकडील अनेक यात्राही रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईतील सिद्धिविनायक, शिर्डीतील साई मंदिरासह राज्यातील प्रमुख देवस्थानांनीही दर्शनासाठी मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसैनिक म्हणतात,’राजसाहेब मी तुमचा तानाजी’

Arati More

अमित शाहांचा शिवसेनेला छुपा संदेश? भाजप-सेना एकत्र येण्याचे पुन्हा संकेत?

Gauri Tilekar

‘देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बिलकूल दाद दिली नाही’, अन्वय नाईक कुटुंबीयांचा आरोप

News Desk