HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive : राजू शेट्टींनी ही आमदारकी पायाखाली तुडवायला हवी | सदाभाऊ खोत

मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेची ऑफर स्विकारली यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नाराज का झाले, याबद्दल राजू शेट्टींनी विचार करायला हवा, असे मत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना मांडले आहे. लढणारी माणसे हे कधी हुजरे आणि मुजरे करायला दरबारात उभी राहत नसतात पण राजू शेट्टींनी हुजरे आणि मुजरे करणारांचे ऐकले. आणि लढणाऱ्या माणसांचे नेहमी राजू शेट्टींनी पंख कापले, असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

सदाभाऊ खोत हे राजू शेट्टींच्या आमदारकी प्रश्नावर बोलताना म्हणतात, “कोणत्याही चळवळीतील कार्यकर्ते असो ते सभागृहात असले पाहिजेत . कारण विधानसभेच्या पटलावर कायदे तयार होत असतात. हे कायदे सर्वसामान्यांना कसे सुसाह्य झाले पाहिजे. जेणे करून या कायद्याचा त्रास सर्वसामान्याना झाला नाही पाहिजे. यासाठी मातीतील लोक सभागृहात असणे गरजेचे आहे. माझा राजू शेट्टींना विरोध नाही, असे सदाभाऊ खोत यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. राजू शेट्टींनी ज्या पद्धतीने आत्मकेंद्री राजकारण केले,माझ्या पलिकडे कोणाला समजत नाही. एखादा कार्यकर्ता त्यांच्या बरोबरीचा निघाला आणि तो पुढे जाईल तर तो डोईजड होईल का?, अशी भीती राजू शेट्टींना कायम वाटते, असे सदाभाऊ खोत यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

राजकारणात किती कपटनितीने वागावे, यालाही मर्यादा असतात

२०१७ ते १९ दरम्यान, आमच्या सरकारच्या वेळी आम्ही एवढा शेतमाल खरेदी केला होता. हा शेतमाल ठेवण्यासाठी आमच्याकडे गोदाम नव्हते एवढा शेतमाल आम्ही खरेदी केला होता. पण, आज राज्य सरकारने शेतकऱ्यांचा २५ टक्के देखील शेत माल खरेदी केला नाही. मात्र, आता राजू शेट्टींनी आंदोलन केले नाही. आज शेतकऱ्यांचा शेतमाल घरात पडलाय. पण राजू शेट्टींना आंदोलन केले नाही. परंतु आमच्या सरकारच्या वेळी शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन मंत्रालयाच्या समोर ठेवला होता आणि सरकार शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करत नाही, असे म्हणत आंदोलन केले होते, राजकारणात किती कपटनितीने वागावे, यालाही मर्यादा असतात, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केली आहे.

आमदारकीला पाया खाली तुडवतोय असे राजू शेट्टींनी म्हटले पाहिजे

राजू शेट्टींची लोकसभेची निवडणूक मी आणि राजू शेट्टी आम्ही दोघांनी लढविली. आपला प्रतिनिधी हा दिल्लीमध्ये गेला पाहिजे, अशी आमची भावना होती. कारण कृषीचे धोरण हे दिल्लीमध्ये ठरते. हे आम्ही मान्य केले होते. त्यापद्धतीने लोकांनीही आम्हाला सहकार्य केले. दुसऱ्या निवडणुकीत आम्ही महायुतीबरोबर गेलो. तेव्हा मी म्हाडा मतदारसंघात गेलो होते. तेव्हा मी भाजपचे चिन्ह घेतले नाही. जर भाजपचे चिन्हे घेतले असते, तर मी सहज विजय झालो असतो. परंतु तसा मोह माझ्या मनात आला नाही. कारण माझी चळवळ टीकली पाहिजे. माझ्यासाठी खासदारकी आमदारकी नाही. पण राजू शेट्टी फक्त एवढचं म्हणतात , मी कशा पद्धतीने या चळवळीला योगदान दिले,मी या चळवळीसाठी रक्त सांडले, असे राजू शेट्टींना सांगण्याची सवय आहे. पण या सदाभाऊंनीपण चळवळीसाठी मार खाला होता. आमच्या आंदोलनात दोन तरुण कार्यकर्त्यांचा जीव गेला. हे दोन्ही तरुण आमच्यासोबत आले होते. आंदोलनादरम्यान त्यांचे प्राण गेले. त्यांचे प्राण परत येणार आहे का?, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींना एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केले आहे. आज तुम्ही बारामतीला गेला होता, त्या वेळी सरकार कोणाचे होते. शरद पवार यांच्या सरकारविरोधात तुम्ही तरुण पोरांना लढाईला उभे केले. तेव्हा तरुण मुलांचे प्राण गेले, आणि अनेक कार्यकर्ते जेलमध्ये गेले. जर तुम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार होतात. मग तुम्ही का तरुण मुलांचा जीव घेतलात ?जर माझ्या कार्यकर्त्यांना एवढा त्रास झाला तर मी या आमदाकीला पाया खाली तुडवतोय असे राजू शेट्टींनी म्हणायला हवे होते, अशी भूमिका सदाभाऊ खोत यांनी एच. डब्यू. मराठीशी बोलतानां मांडली.

भावनिकतेचा पाढा किती दिवस वाचणार ?

दरम्यान, कार्यकर्त्यांचा संताप अनावरण झाल्यावर मग मला आमदारकीची गरज नाही. माझ्या दृष्टीने माझ्यासाठी चळवळ महत्वाची आहे. हा भावनिकतेचा पाढा किती दिवस वाचणार आणि कार्यकर्त्यांचा बळी घेणार, असे टीकास्त्र सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर डागले आहे. राजू शेट्टींनी आमदारकी स्व:ता स्वीकारावी की कार्यकर्त्यांना संधी द्यावी, हा राजू शेट्टींच्या पक्षांचा अंतर्गत भाग आहे. आता या आमदारकीचा एवढा गाजावाजा झाला,लोकांनी आणि शेतकऱ्यांनी एवढी नाराजी व्यक्त केली आहे तर कदाचित राजू शेट्टींनी आमदारकी नाकातील. तेव्हा राजू शेट्टी म्हणतील, मला आमदारकी महत्वाची नाही. मला माझी चळवळ आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहे. मी सर्व लोकांचे मत जाणून घेतले. मग माझ्या लक्षात आले की, लोकांना आमदारकीची गरज नाही. म्हणून मी तुमच्यासाठी आमदारकीचा त्याग केला, असे सोशल मीडियावर नवीन सुत्र तयार करतील.

महाविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या विक्रीमालाची व्यवस्था केली नाही

लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा शेतमाल शेतात सडला. महाविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या विक्रीमालाची व्यवस्था केली कुठेही केली नाही. आंब्याची विक्री व्यवस्था देखील या सरकारने केली नाही. राज्यात लॉकडाऊनच्या काळात बाराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या तीन महिन्यात शेतकऱ्यांना कोणत्याच समस्या नाहीत का ? तेव्हा का राजू शेट्टींना का काही बोलावसे वाटत नाही. आमदारकी नाकारल्यानंतर राजू शेट्टींचा भावनिक आध्याय सुरू होईल, मला वाटते चळवळ टीकली पाहिजे. चळवळ महत्वाची आहे. अजून राजू शेट्टींनी विचार करावा, असेही सदाभाऊ खोत यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले.

लढणारी माणसे हे कधी हुजरे आणि मुजरे करायला दरबादात उभे राहत नसतात

मी मंत्री असताना राजू शेट्टींनी माझ्याविरोधात एक चौकशी समिती स्थापन केली. लढणारी माणसे हे कधी हुजरे आणि मुजरे करायला दरबादारात उभे राहत नसतात. पण, राजू शेट्टींनी हुजरे आणि मुजरे करणारांचे ऐकले. आणि लढणाऱ्या माणसांचे नेहमी राजू शेट्टींनी पंख कापले, म्हणून आज ही वेळ त्यांच्यावर आली आहे. कार्यकर्त्यांना का राग आला याचा विचार राजू शेट्टींनी कराला हवा होता. कारण ही चळवळ प्रस्थापिंताविरोधात पुकारली होती. या चळवळीच्या माध्यमातून प्रस्थापितांच्या विरोधात आवाज घुमायला लागला होता. या चळवळीच्या माध्यमातून शेतकरी बोलायले लागले. शेतकऱ्यांना या चळवळीचा आधार होता, असे सदाभाऊंनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

संपूर्ण मुलाखत

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमरावती जिल्ह्याच्या ऊर्जाविकासासाठी २२ उपकेंद्रे प्रस्तावित – नितीन राऊत

Aprna

पोलीस बळाचा वापर करून नगरसेवकांवर दबाव आणला जातोय, प्रविण दरेकरांचा गंभीर आरोप  

News Desk

थातूरमातूर बोलून विषय टोलवू नका, राम कदमांचे राऊतांना आव्हान 

News Desk