HW News Marathi
महाराष्ट्र

तुमच्या राज्यात मला जगण्याची इच्छा नाही, सरकारला निरोप पोहोचवा; अण्णा हजारांची नाराजी

मुंबई | “मला तुमच्या राज्यात जगण्याची इच्छा नाही, सरकारला निरोप पोहचवा,” असे म्हणत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयावरून अण्णा हजारेंनी नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे हे उद्यापासून (१४ फेब्रुवारी) आमरण उपोषणावर बसणार आहेत. अण्मा हजारे हे राळेगणसिद्धच्या आज (१३ फेब्रुवारी) ग्रामसभेनंतर बोलताना राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. अण्णा हजारे म्हणाले, “तुम्ही वाईन का आणता आणि तुम्ही सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवताय का?, म्हणून मला तुमच्या राज्यात जगायचे नाही. हा प्रश्न राळेगणसिद्ध नाही राज्याचा आहे. जो वाईनचा निर्णय घेऊ तो जनतेला विचारून घेऊ, मला जगायची इच्छा राहिली नाही उद्यापासून मी आमरण उपोषण करणार आहे. कारण माझे मन मरून गेलेले आहे.  

अण्णा हजारे म्हणाले,  “महाराष्ट्रात परमीट रुम कमी आहेत का?, मग सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री का ?, वाईन ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का?, छत्रपती शिवाजींच्या राज्यात वाईन ही संस्कृती आहे. तुकाराम महाराजांच्या राज्यात वाईन ही संस्कृती आहे. ही संस्कृती जनत करण्यासाठी किर्तनकार किर्तन करातत. मुलांवर संस्करा व्हावे, म्हणून रात्रांदिवस किर्तन करतात. आणि तुम्ही किराणा दुकानात वाईन ठेवून ही संस्कृती बर्बाद करायला निघालात. म्हणून जगण्याची इच्छा होत नाही. आता झाले ८४ वर्ष खूप झाले. अशा प्रकारचे हे निर्णय राज्य सरकार जे घेत आहे. काल त्यांचे सेक्रटरी आले, मी त्यांना विचारले तुम्ही लोकशाहीला मानताना. लोकशाही ही लोकांची आहे. तुमचे मंत्रिमंडळ मनाने निर्णय घ्याला लागले. तुम्ही याला लोकशाही म्हणार का?, मंत्रिमंडळाला जर निर्णय घ्याचा आहे, तर तुम्ही आधी जनतेची मान्यता घ्यावी. आपली देशात लोकशाही आहे, आणि तुम्ही सर्वजण सेवक आहात. त्यामुळे जनतेची परवानगी घ्याला हवी. जनतेने परवानगी न घेता मंत्रीमंडळाने मनाने निर्णय घेताल. ही लोकशाही नाही, हुकूमशाही आहे. म्हणून मी ठरविले की, तुमच्या राज्यात जगायची इच्छा राहिली नाही.” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत 1 सप्टेंबरपासून सुटे दूध 7 रुपयांनी महागणार; प्रतिलिटर 80 रुपये मोजावे लागणार

Aprna

विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध!– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा, तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला – शरद पवार

News Desk