HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांना ‘तो’ सल्ला मीच दिला होता!; नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट

मुंबई। गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीकडून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना नोटीस पाठवल्यानंतर ‘ईडी’च्या कार्यालयात जाणार असल्याची घोषणा करण्याचा सल्ला मीच पवार यांना दिला होता,’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसंच ‘ईडी’चा पदार्फाश करणार असून, हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

भाजपवरही निशाणा साधला

पुण्यात कार्यकर्त्यांकडून नवाब मलिकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात नवाब मलिक यांनी भाजपवरही निशाणा साधला. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार चेतन तुपे, माजी महापौर अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेविका नंदा लोणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते.

या निर्णयाची घोषणा केली होती

नवाब मलिक पुढे म्हणाले की, ‘पवार यांना ‘ईडी’ने नोटीस पाठवल्यानंतर काय करायचे, यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी काहीजणांनी वकिलांचा सल्ला घेण्याची सूचना केली. तेव्हा ही कायदेशीर लढाई नसून, राजकीय लढाई असल्याचं निदर्शनास आणून देऊन पवार यांना ‘ईडी’च्या कार्यालयात जाण्याची घोषणा करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची घोषणा केली होती.’ असं नवाब मलिक यांच्याकडून आता स्पष्ट करण्यात आले.

भाजपवाल्यांच्या सीडी आहेत

एनसीबी झाली, आता ईडीची बारी आहे. मी आता ईडीचा पर्दाफाश करणार. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भंडाफोड करण्यासाठी हायड्रोजन बॉम्ब मी अजून फोडलेला नाही. तो योग्यवेळी नक्कीच फोडेन. माझ्याकडेही भाजपवाल्यांच्या अशा सीडी आहेत की ज्या लावल्या तर यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही”, असा खळबळजनक दावा नवाब मलिकांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये महिला वाहकांचे भाकरी थापून अनोखे आंदोलन!

News Desk

भोकरसह इतर पाणी टंचाई असलेल्या गावासाठी मंजूर कामे त्वरीत करा! – अशोक चव्हाण  

Aprna

“अगोदर तुमच्या नवऱ्याला नितीमत्ता शिकवा !” मेहबूब शेख यांची चित्रा वाघ यांच्यावर टीका

Jui Jadhav