HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

“ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपवताना कळवळा कुठे होता?”,रोहिणी खडसेंचा फडणवीसांना सवाल

मुंबई। निवडणुकांच्या विरोधात आम्ही आंदोलन तर करणारच आहोत. पण तरीही या सरकारचा जर निवडणुका लढवण्याचा डावच असेल तर भाजप या सगळ्या जागांवर फक्त ओबीसी उमेदवार लढवेल. जिंकलो, हरलो तरी आम्हाला पर्वा नसल्याचं देेवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या त्यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिनी खडसे यांनी चांगलाच समाचार घेतलाय.”ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता”?, असा प्रश्न त्यांनी फडणवीसांना केला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांच्या राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच थेट हा हल्ला केलाय. त्यांनी ट्विट करत फडणवीसांना सवाल केलाय. भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता…? आता गळा काढण्यात अर्थ नाही, असं रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत.

रोहिणी खडसेंनी का केली ही टीका?

नाथाभाऊ भाजपमध्ये असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी क्षणाक्षणाला त्रास दिलाय, वेळोवेळी छळलं, प्रसंगी पक्षातून बाहेर जाण्यासंबंधीचं पाऊल उचलावं लागलं, अशी थेट टीका स्वत: एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशा प्रसंगी केली होती. ओबीसी नेतृत्व डळमळीत करण्याचं कामही फडणवीसांनी अनेकदा केल्याचं खडसेंनी म्हटलं. याचाच संदर्भ रोहिणी खडसे यांच्या या ट्विटला आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

राज्यातील मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोना आणि इतर मुद्द्यांवरून 14 दिवसांचं अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षाने केली होती. मात्र राज्य सरकारने फक्त दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच राज्यात जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सदस्यपदाच्या २०० जागांसाठीच्या पोटनिवडणुकांची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात मतदान होणार आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

निवडणुकांच्या विरोधात आम्ही आंदोलन तर करणारच आहोत. पण तरीही या सरकारचा जर निवडणुका लढवण्याचा डावच असेल तर भाजप या सगळ्या जागांवर फक्त ओबीसी उमेदवार लढवेल. जिंकलो, हरलो तरी आम्हाला पर्वा नसल्याचं देेवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या निवडणुकांवरून फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आम्ही या जागा ओबीसींसाठी आरक्षित आहेत असं समजून ओबीसी उमेदवार लढवू. जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत भाजप शांत बसणार नसल्याचं म्हणत फडणवीसांनी देेवेंद्र फडणवीस यांनी सरकारला इशारा दिला आहे.

Related posts

दिग्विजय यांचे मोदींना आव्हान, हिंमत असेल तर माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

News Desk

महाराष्ट्रातील लॉकडाऊन विरोधात खासदार उदयनराजेंचं ‘भीख मांगो’आंदोलन

News Desk

महाराष्ट्रात पुढच्या 2 ते 4 आठवड्यात तिसरी लाट? टास्क फोर्सने खरंच असं सांगितलंय? सत्य काय ?

News Desk