HW News Marathi
महाराष्ट्र

मी राजीनामा दिला नाही आणि माझ्याकडे मागितलाही नाही – धनंजय मुंडे

मुंबंई | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला. दरम्यान, ज्या रेणू शर्मा यांनी हा आरोप केला तिच्या मोठ्या बहिणीशी म्हणजे करुणा शर्माशी संबंध होते असे स्पष्टपणे धनंजय मुंडे यांनी सांगितले होते. दरम्यान, आज (१४ जानेवारी) धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षाकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर धनंजय मुंडे असं म्हणाले की, माझ्याकडे राजीनामा मागितला नाही आणि मी राजीनामा दिला नाही. तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंडेंच्या राजीनाम्याचा विषय माझ्यापर्यंत आला नाही असे म्हटले. त्यामुळे तुर्तास तरी या विषयाला राष्ट्रवादीकडून पुर्णविराम लागला आहे.

दरम्यान, “धनंजय मुंडे यांनी स्वत: माझी भेट घेतली आहे. मला भेटून एकंदर त्यांच्यावरील आरोपाची सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यानंतर काही तक्रारी झाल्या. त्याबाबत चौकशी सुरु झालेली असेल. हे प्रकरण इथपर्यंत येईल, व्यक्तिगत हल्ले होतील असा अंदाज त्यांना असावा. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात यापूर्वीच आपली भूमिका मांडली आहे”, असंही शरद पवार म्हणाले.

“धनंजय मुंडे प्रकरणात आधी मला निर्णय घेऊ द्या, नंतर मुख्यमंत्र्यांचं बघू. आम्हाला आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करुन पुढची भूमिका काय असावी याचा निर्णय विचाराने होईल. त्यासाठी आम्ही आमचा निर्णय घेऊ, निर्णयासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी लागणार नाही. आम्हाला पक्षप्रमुख म्हणून निर्णय घ्यावा लागेल. त्यात कुणावरही अन्याय होणार नाही, हे ही पाहावं लागेल,” असंही पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र येणार

News Desk

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक मंजूर

Aprna

सहकार्याचा मार्ग नॅरोगेज न राहता ब्रॉडगेज असावा, उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना साद

News Desk