HW News Marathi
महाराष्ट्र

‘मुख्यमंत्र्यांना मी शुभेच्छा दिल्या तुम्ही काळजी करू नका’, राज ठाकरे..!

ठाणे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे दौरा करुन मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी पूरस्थितीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे तर नियोजनशून्य कारभारामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.नियोजन नाही, त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. महापूर हा काही पहिल्यांदाच आलाय असं नाही. नुसते रस्ते वाढत आहे, त्याला आकार नाही. नियोजन पहिले महत्वाचे आहे. ठाणे शहराची परिस्थिती वेगळी नाही. मी लहान असताना ठाणे शहर कसे होते आणि आता कसे आहे हे पाहतोय. टाऊन प्लॅनिंग नाही. त्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भ्वत आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना मी शुभेच्छा दिल्या आहेत, तुम्ही काळजी करू नका

पूरग्रस्तांना प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने मदत करत आहे. मनसेच्यावतीने देखील त्या त्या भागात मदतकार्य सुरू आहे. मदतकार्य महत्वाचे आहे. नुसती पाहणी करून काहीही अर्थ नाही, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना मी शुभेच्छा दिल्या आहेत, तुम्ही काळजी करू नका, असं म्हणत राज यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसावर भाष्य केलं.

ठाण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक

नाशिक आणि पुणे पाठोपात मनसे आता ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाणे पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार आहे. ठाण्यातील सीकेपी हॉलमध्ये थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे. या बैठकीत ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा मुख्य अजेंडा ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीत मोठे फेरबदल होण्याचे संकेतही दिले जात आहेत. दरम्यान, ठाण्यात मनसेचा सध्या एकही नगरसेवक नाही. अशावेळी ठाणे महापालिकेसाठी होणारी मनसेची ही बैठक महत्वाची ठरणार आहे.

राज ठाकरेंची ठाण्यातली बैठक

ठाण्यातील CKP हॉलमध्ये मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला आहे. या संवादात त्यांनी पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र दिला असेल हेच पाहणं गरजेचं आहे. ठाण्यात गेली अनेक वर्षे मनसेचा लोकप्रतिनिधी म्हणून पालिका स्थरावर कुणीही दिसून आलेला नाही. त्यामुळे पक्षाला लागलेली गळती कशी भरून निघणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसंच भाजप बरोबर जवळीकीचा विचार याकडेदेखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाणे शहरात राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी जागोजागी बॅनरबाजी आणि मनसेचे झेंडे लावण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रयत्न करा – रविंद्र चव्हाण

Manasi Devkar

महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही, राजेश टोपेंची माहिती

News Desk

SushantSinghCase : ज्यांनी महाराष्ट्राची आणि पोलिस दलाची बदनामी केली त्यांनी जाहीर माफी मागावी – रोहित पवार

News Desk