HW News Marathi
महाराष्ट्र

“बाळासाहेब असते तर पहिलं आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते,” नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यावर प्रहार

मुंबई | दिवंगत हिंदुद्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन आज (३१ मार्च) पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजनासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आलेलं नाही. दरम्यान यावरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांना निमंत्रण न दिल्याने भाजपकडून सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “आज मा. बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं. त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत!”.दरम्यान यावेळी त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही आमंत्रण न देण्यावरुन आश्चर्य व्यक्त केलं आहे. “नगरविकास मंत्री एकनाथ यांनाही निमंत्रण कसं नाही? प्रोटोकॉल? आश्चर्य”.

 

संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास भूमिपूजनाचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या उपस्थितांसह कार्यक्रम पार पडेल आणि त्याचं ऑनलाइनच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या दादरमधील स्मारकासाठी ४०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या मंजूरी देण्यात आली आहे. महापौर निवासात ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी दोन टप्प्यांमध्ये काम करण्यात येणार आहे. इमारतींचे बांधकाम, वाहनतळ, उद्यान आदी कामे करण्यात येतील,. दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान, लेझर शो, ग्रंथालय, चित्रपट आदी कामांचा समावेश आहे. या स्मारकासाठी सुरुवातीचा खर्च मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून केला जाईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपमुख्यमंत्र्यांची सोशल डिस्टन्स राखत काम करण्याची अनोखी पद्धत !

News Desk

एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार?

News Desk

भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून हिंदू धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न!: सचिन सावंत

News Desk