HW News Marathi
महाराष्ट्र

कोणालाही न घाबरता अमरावतीमध्ये जाणार, मला अटक करून दाखवा! – रवी राणा

मुंबई | ‘मला जेलमध्ये टाकले तर मी जेलमध्ये जाईन, कोणालाही न घाबरता अमरावतीमध्ये जाणार आणि मला अटक करून दाखवा,” असे आवाहन आमदार रवी राणा यांनी राज्य सरकारला केले आहे. माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला असून कारण माझ्यावर राजकीय कारस्थानमुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविरोधात मी न्यायालयात दाद मागणार आहे. आणि माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला आत आहे, असा आरोपही रवी राणांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

‘आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपुरात जाता येणार नाही,’ अशी धमकी देणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ‘मग त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करा,’ अशी मागणी राणांनी प्रसार माध्यमांतून केली आहे. तसेच नितेश राणेंप्रमाणे मलाही केसमध्ये अडकविण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला. 

अमरावती आयुक्तांवर शाई फेकल्याप्रकरणी रवी राणाविरोधात ३०७ कलमान्वये हत्येचा प्रयत्न केल्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रवी राणा व्यतिरिक्त आणखी १० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आयुक्त शहरातील राजापेठ उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गात सांडपाणी साचत असल्यामुळे आयुक्त यांची पाहाणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा अचानक महिला कार्यकर्त्या आल्या आणि त्यांनी आयुक्तांच्या अंगावर शाई फेकली. 

नेमके काय आहे प्रकरण

आम्ही समस्त शिवप्रेमी आणि युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी १२ जानेवारी रोजी राजापेठ उड्डाणपुलावर शिवरायांचा पुतळा बसविला होता. यानंतर महापालिकेने विना परवानगी पुतळा बसवल्यामुळे १६ जानेवारीच्या मध्यरात्री हा पुतळा हटवून ताब्यात घेतला.अमरावतीच्या राजापेठ येथील उड्डाण पुलावर पुलावर छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा आमदार रवी राणा यांनी बसवला होता. यामुळे अमरावतीत राजकारण तापले. यानंतर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस व एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…शपथ देऊनही कार्यकर्ते थांबतील का ?, मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला टोला

News Desk

‘वेळ आली तर शिवसेना भवन फोडू’, या विधानाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर!

News Desk

राष्ट्रवादीच्या विक्रमी सभांमुळे महाराष्ट्रात तुफान

News Desk