HW News Marathi
महाराष्ट्र

कॉम्प्युटर हॅक होऊ शकतात, तर ईव्हीएम का नाही !

मुंबई | कॉम्प्युटर हे सर्वात चांगले मशीन आहे. परंतु तेही हॅक होऊ शकते. मग ईव्हीएम का हॅक होऊ शकत नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. राजेपुढे असे देखील म्हणाले की, साताऱ्यात आज बॅलेटपेपरवर मतदान घ्यावे, त्याचा सर्व खर्च मी करेन, असे आव्हान उदयनराजेंनी आज (२४ जून) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. मी एक खासदार म्हणून, देशाचा नागरिक म्हणून मत मांडत आहे. लोकशाही कशी अबाधित राहावी, यासाठी ही पत्रकार परिषद घेतली असल्याचे उदयन राजेंनी यावेळी सांगितले.

राजे पुढे म्हणाले की, साताऱ्यात एकूण झालेले मतदान आणि निकालातील मतांमध्ये तफावत आढळून आल्याचा आरोप त्यांनी केला. सातारा लोकसभा मतदारसंघातील तफावत दाखविताना त्यांनी वाईमध्ये ३४४ मते अधिक, कोरेगावात ५ मते अधिक, उत्तर कराडमध्ये १४८, द. कराडमध्ये ५, पाटणमध्ये ९७ मते अधिक पडल्याचे दिसत आहे. तर साताऱ्यात ७५ मते कमी पडल्याचे दिसून आले आहे. हे कसे होऊ शकते, असा सवालही उदयनराजेंनी व्यक्त केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे निधन

Aprna

शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे सरकारचे आवाहन!

News Desk

बंडातात्या कराडकर ‘गनिमी काव्याने’ पंढपूरला जाणार, पोलीस झाले सतर्क

News Desk