HW News Marathi
महाराष्ट्र

“… तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही!”, शेलारांचा मलिकांना इशारा

मुंबई | अमरावती हिंसाचारवरून राज्यात रजकारण सुरू आहे. भाजप नेते आशिष शेलार हे रझा अकादमी नेत्यांसोबत बैठक करत असल्याचा फोटो राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज (१५ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेतून दाखवल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. मलिकांच्या आरोपाला शेलारांनी प्रत्युत्तर दिले. “रझा अकादमीसोबतचे तुमचे सगळ्यांचे आम्ही फोटो दाखवले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही!”, असे व्हिडिओ ट्वीट करत त्यांनी मलिकांवर पलटवार केला आहे.

शेलारांनी ट्वीट करत व्हिडिओ करत मलिकांवर आरोप केले आहे. शेलार म्हणाले, “”नवाब मलिक यांना मी मराठीतील ती म्हण पूर्ण सांगणार नाही. पण तुमची खोड काही जात नाही एवढं मात्र खरं. अशापद्धतीनं दरवेळी वेगवेगळ्या फोटोंच्या जीवावर अफवांचं राजकारण करणं हा तुमचा धंदा आहे. त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेल्या दंगलीचा आणि २०१६-१७ सालच्या फोटोचा काय संबंध?”, असा सवाल शेलारांनी उपस्थित केला आहे.

मलिकांचे शेलारांवर आरोप

“भाजप नेते आशिष शेलार हे रझा अकादमीच्या कार्यालयात का गेले ?. याठिकाणी शेलारांची अकादमीच्या नेत्यांसबोत मिटिंग झाली असून हा सर्व षडयंत्राचा भाग होता का ?, असा आरोप मलिकांनी आज (१५ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेतून केला आहे. यावेळी शेलारांनी पत्रकार परिषदेत शेलारांचा एक फोटो दाखविला असून या फोटोत रझा अकादमीच्या नेत्यासोबत एकत्र बसून बैठक करत असल्याचे दिसत आहे, असा आरोप मलिकांनी केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

HW Exclusive | धनंजय मुंडेंची तशी काही कामगिरी दिसली नाही…

Arati More

मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी

swarit

‘ठरल्याप्रमाणे झालं असतं तर मी फोटोग्राफी करुन तुम्हाला प्रदर्शनाला बोलावलं असतं’ फडणवीसांना प्रतिउत्तर

News Desk