नवी दिल्ली। ऑनलाईन परीक्षेत पास होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पहिला नंबर आला आहे, अशा शब्दात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टोला लगावला. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर आले आहेत. आता ऑनलाईन परीक्षेत ते पास झाले आहेत, त्यांनी आता आरक्षण द्यावे नाही तर जनता तुम्हाला माफ करणार नाही”, असं दानवे म्हणाले.
दानवे यांचा हल्लाबोल
मुंबई लोकल रेल्वे, मराठा आरक्षण अशा मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. तसंच त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या कारभावर प्रश्न उपस्थित केले.काही गणितं केंद्राने सोडवली आहेत, आता काही गणितं राज्य सरकारने सोडवावीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकवर आले आहेत. ते ऑनलाईन परीक्षेत पास झाले आहेत. आता त्यांनी आरक्षण द्यावे, नाहीतर जनता माफ करणार नाही, असा हल्लाबोल रावसाहेब दानवे यांनी केला.
ज्याक्षणी राज्य सरकार सांगेल त्या क्षणी लोकल निर्णय
ज्याक्षणी राज्य सरकार सांगेल त्या क्षणी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेऊ असी प्रतिक्रिया रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. राज्यात ब्रेक दी चैन अंतर्गत मुंबई लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवास करण्यास मुभा नाही आहे. त्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसांपूर्वी कोरोना रुग्णसंख्या कमी झालेल्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कमी करत जनतेला दिलासा दिला आहे. मात्र अद्यापही मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.