मुंबई | अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईत दाखल झाल्यानंतर आपल्या कार्यालयाचा झालेला नायनाट पाहत शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तिने एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असा एकेरी उल्लेख करणे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना पटलेलं नाही. याप्रकरणावर ट्विट करत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
‘शिवसेनेसोबत आमचे राजकीय मतभेद आहेत. पण उद्धव ठाकरे हे माझे मुख्यमंत्री आहे. त्यांचा अनादर तेही अशा टॉम, डिक आणि हॅरी करून हे स्वीकारार्ह नाही. कंगनाने तिने केलेल्या वक्तव्याचा विचार करायला हवा,’ असे इम्तियाज जलील यांनी ट्विट करून म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा असा एकेरी उल्लेख केल्यानंतर सर्व स्तरांतून संताप वाढला.
We may have political differences with Shiv Sena but Uddhav Thackeray is also my chief minister and any disrespect to him and that too by any Tom, Dick and Harry is simply unacceptable. Kangana should mind her language.
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) September 9, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.