HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमध्ये विकास कामांवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी

बीड | बीडमध्ये विकास कामाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालीये. आज बीडमध्ये शंभर कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या विकास कामाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला मंत्री धनंजय मुंडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. मात्र हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच बीडमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. स्थानिक आमदार आम्ही आणलेल्या कामावर डल्ला मारत आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी विशेष कामं म्हणून या कामांना मंजुरी दिली आहे. मात्र स्थानिक आमदार हे काम करताना आडकाठी आणत आहेत. असं म्हणत शिवसैनिक आज बीडमध्ये रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच प्रचंड घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवून या विकास कामाच्या उद्घाटन सोहळ्याचा निषेध नोंदवला आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवून, अजित दादा तुमच्या राष्ट्रवादीच्या आमदाराला आघाडीचा धर्म शिकवा. असं म्हणत बॅनर आणि घोषणाबाजी करण्यात आलीय. यावेळी काळे झेंडे घेऊन हे शिवसैनिक रस्त्यावर आले आहेत.महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादी विकास कामाच्या उद्घाटनावरून आमने-सामने आलीय. बीड शहरातील शंभर कोटी पेक्षा जास्त विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रम होत आहे. स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षिरसागर हे शिवसैनिकांना काम करू देत नाहीत. शिवसैनिकांनी आणलेल्या कामाचे उद्घाटन परस्पर आमदार करत आहेत. असा आरोप शिवसैनिकांनी केलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबरीच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा आनंद काय घेताय? – संजय निरुपम

News Desk

आज मराठा आरक्षणाचा निकाल

News Desk

राज्यांचे ब्रँडींग करताना कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा! – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Aprna