HW News Marathi
Covid-19

लोकल, लग्न समारंभामुळे महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ, केंद्रीय पथकाचा अहवाल

मुंबई | देशभरात कोरोनाचं संक्रमण कमी होत असताना राज्यात आणि मुंबईत कोरोनाचा प्रसार वेगाने सुरु झाला आहे. राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असताना कोरोना रुग्णांचं प्रमाण झपाट्यानं का वाढू लागलं? याची केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी केली. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर कोरोना संपला असं समजून लोकांचा वाढलेला निष्काळजीपणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लग्न, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली वाढ आणि लोकलसह सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु करणे अशा काही गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असं केंद्रीय पथकाने सांगितलं.

महत्त्वाची बाब म्हणजे लोकलमधील गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं केंद्रीय पथकाने अहवालात म्हटलं आहे. आरोग्य यंत्रणा देखील आता खुप गांभीर्याने काम करत नसल्याचं केंद्रीय पथकाने अहवालात नमूद केलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव निपुण विनायक यांच्यासह तीन जणांच्या पथकाने १ आणि २ मार्चला हा कोरोना पाहणी दौरा केला होता.

कोरोना रुग्णसंख्य झपाट्याने वाढत असताना त्यावर लवकर नियंत्रण मिळवणे गरजेचं आहे. त्यासाठी सरकारने कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे, रुग्णांचा शोध घ्यावा, कोरोना संबंधीच्या नियमांचे काटेकोरपण पालन केले पाहिजे अशा सूचना केंद्रीय पथकाने केल्या आहेत. काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा आणि लसीकरण सुरू ठेवावे असंही केंद्रीय पथकाने सुचवलं आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती

काल ७ मार्चला रोजी महाराष्ट्रात ११,१४१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात ६०१३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ९७,९८३ झाली आहे. महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता २२,१९,७२७ पर्यंत वाढली आहेत. राज्यात आतापर्यंत५२,४७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माय लॉर्ड, मंदिरे उघडा हो !… ‘शिवसेने’ची मागणी 

News Desk

देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या दीड लाखांच्या घरात, कोरोनाबळीही घट

News Desk

देशात पहिल्यांदाच एका दिवसात ४ लाखांपेक्षा अधिक रूग्णांची नोंद

News Desk