HW News Marathi
Covid-19

सोलापुरात कोरोनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराचा मृत्यू

मुंबई | सोलापूरमध्ये कोरोनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी आमदारांचा मृत्यू झाला आहे. या माजी आमदारांचे नाव युनूस शेख होते. शेख यांचा शनिवारी (१३जून) कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. यानंतर शेख यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यास सुरू झाला होता. मात्र, उपचारादरम्यान शेख यांचा मृत्यू झाला. शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू मानले जातात.

सोलापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सोलापूर शहरात काल ४१ तर सोलापूर ग्रामीण भागात ६ रुग्ण आढळून आले. तसेच सोलापूर शहरात ६ तर ग्रामीण भागात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ हजार ६५९ वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत सोलापूरमध्ये १४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचा एका नगरसेवकाचा १० जून रोजी कोरोनामुळे प्राण गमावले आहे. गेल्या १५ दिवसांपासून एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराला २७ मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती

संबंधित बातम्या

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना पॉझिटिव्ह असताना डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये ग्रँड एन्ट्री

News Desk

देशात ५० हजारांच्या पुढे रुग्ण झाले कोरोनामुक्त!

News Desk

राज्यात आज १६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले

News Desk