HW News Marathi
महाराष्ट्र

होर्डिंग प्रकरणी कॅप्शन अॅडव्हर्टाझिंग कंपनीच्या मालकाला अटक

पुणे । होर्डिंग कोसळून ४ जणांच्या मृत्यू झाल्या प्रकरणात कॅप्शन अॅडव्हर्टाझिंग कंपनीच्या मालकाला बंडगार्ड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल रज्जाक महंमद खालीद फकिह(वय ५४) असे या जाहिरात कंपनीच्या मलकाचे नाव आहे.

कॅप्शनकडून परवान्याची मुदत संपल्याने कोसळलेल्या होर्डिंगसह परिसरातील इतर तीन होर्डिंग काढण्याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकांना १३ डिसेंबर २०१७ रोजी वारंवार पत्र पाठवून सांगितले होते. मात्र रेल्वे प्रशासनाकडून या संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप महानगरपालिकेने केला आहे.

नेमकी काय आहे घटना

पुण्यातील जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकातील एक मोठे लोखंडी होर्डिंग शुक्रवारी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास कोसळले होते. या अपघात चार जणांचा मृत्यू झाला असून आठ ते नऊ जण जखमी झाले होते या अपघाताप्रकरणी रेल्वेच्या एका अभियंता आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. संजय सिंग (सेक्शन इंजिनिअर) आणि पांडुरंग वनारे (कर्मचारी) अशी या दोघांची नावे आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असतील तर राजभवनात जाऊन सांगावं लागेल, राऊतांचा पाटलांना टोला

News Desk

शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची फेरतपासणी करावी 

News Desk

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू

News Desk