HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे होर्डिंग अपघात प्रकरणी रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

पुणे | पुण्यातील जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकात काल (शुक्रवारी) एक मोठे लोखंडी होर्डिंग कोसळून चार जणांचा मृत्यू झाला तर आठ ते नऊ जण जखमी झाले होते. या अपघाताप्रकरणी रेल्वेच्या एका अभियंता आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. संजय सिंग (सेक्शन इंजिनिअर) आणि पांडुरंग वनारे (कर्मचारी) अशी या दोघांची नावे आहेत. विशेष म्हणजे सदर होर्डिंग अनधिकृत आणि धोकादायक असल्याचे पुणे महापालिकेने रेल्वे प्रशासनाला २०१३ पासून वारंवार पत्र पाठवून सांगितले होते. मात्र रेल्वे प्रशासनाकडून या संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप महानगरपालिकेने केला आहे.

रेल्वे प्रशासनाने हे होर्डिंग अधिक धोकादायक वाटल्याने काल (शुक्रवारी) ते पाडण्याचे काम हाती घेतले होते. त्यावेळी होर्डिंग गॅस कटरच्या सहाय्याने खालच्या बाजूने कापत असताना ते होर्डिंग तेथे असलेल्या वाहनांवर पडले. या अपघातातील जखमींना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांपैकी चार जणांची प्रकृती नाजूक आहे. पोलिसांकडून ठेकेदार आणि उप ठेकेदार यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची देखील माहिती मिळत आहे.

या अपघातानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक अपघातास्थळी पोहोचले होते. या अपघातात काही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. हे होर्डिंग कोसळल्यामुळे शाहीर अमर शेख चौकातील वाहतूक खोळंबली होती. हे होर्डिंग रेल्वेच्या हद्दीत असल्याने रेल्वेच्या मालकीचे आहे.

Related posts

‘छगन भुजबळांनी इम्पेरिकल डेटासाठी पुढाकार घ्यावा,’ आम्ही पाठिंबा देऊ भाजपा!

News Desk

राज्याला कर्तबगार मुख्यमंत्री हवा, राणेंची उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शंका

News Desk

BMC मध्ये लाँड्री नेमकी कपडे धुण्यासाठी की कंत्राटात टक्केवारीत आपले ‘हात धुवून’ घेण्यासाठी?, भाजप आमदाराचा सवाल

अपर्णा