HW News Marathi
महाराष्ट्र

भारताला आणखी एक सुवर्ण पदक!

टोक्यो। भारत टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये कमालीची कामगिरी बजावत आहे. भारतीय पॅरा बॅडमिंटनपटूंची टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी कायम असून प्रमोद भगत पाठोपाठ पॅरा बॅडमिंटनपटू कृष्णा नागरने यानेही सुवर्णपदक मिळवत भारताची पदक संख्या थेट 19 वर पोहोचलवली आहे. आधी सेमीफायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या क्रिस्टन कूंब्सला नमवत त्याने फायनल गाठली होती. त्यानंतर फायनलमध्ये SH6 स्पर्धेत हाँगकाँगच्या चू मॅन कई याला मात देत कृष्णाने सुवर्णपदक खिशात घातलं आहे.

कसा झाला सामना?

कृष्णाने तीन सेट्ममध्ये हा सामना जिंकला. दुसरीकडे भारताचे बॅडमिंटनपटू आणि नोएडाचे DM सुहास यथिराज यांना अंतिम सामन्यात पराभवामुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. कृष्णा आणि चू मॅन कई यांच्यातील सामना सुरुवातीपासून अत्यंत चुरशीचा सुरु होता. पहिला सेट 14 मिनिटांमध्ये कृष्णाने 21-17 च्या फरकाने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये कई याने पुनरागमन करत 21-16 च्या फरकाने सेट आपल्या नावे केला. पण अखेरच्या आणि निर्णायक सेटमध्ये मात्र कृष्णाने कोणतीच चूकी न करता 15 मिनिटांमध्ये सेट 21-17 च्या फरकाने जिंकत सामना आपल्या नावे केला. या विजयासोबतच कृष्णाने सुवर्णपदक जिंकला. विजयानंतर कृष्णाचा आनंद पाहण्याजोगा होता.

रौप्यपदक मिळवणारे भारताचे पहिले IAS अधिकारी

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारत कमालीची कामगिरी बजावत आहे. भारताने शनिवारी ‘पदकचौकार’ खेचल्यानंतर सुहास यशिराज यांनी समारोपाच्या दिवशी रौप्यपदक जिंकत पदकांमध्ये भर टाकली आहे. पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यशिराज यांनी अंतिम फेरी गाठली होती. सुहास यांनी सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती. मात्र पराभव झाल्यामुळे रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं. यासोबत भारताच्या पदकसंख्येने १८ विक्रमी आकडा गाठला आहे.

सुहास यथिराज आयएएस अधिकारी असून टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला आहे. सुहास यथिराज पदक जिंकणारे पहिले आयएएस अधिकारी ठरले आहेत. अंतिम सामन्यात सुहास यशिराज यांच्यासमोर फ्रान्सच्या अग्रमानांकित ल्युकास मझूरचं आव्हान होतं. याआधी सुहास यांनी उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या फ्रेडी सेटियावानवर २१-९, २१-१५ अशा ३१ मिनिटांमध्ये विजय मिळवला होता.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहतील, काँग्रेसला कसं सामावून घ्यायचं त्याची चर्चा करू – संजय राऊत

News Desk

शरद पवारांवरील शस्त्रक्रिया पुर्ण, प्रकृती स्थिर

News Desk

शेतकऱ्याची अजब मागणी! २ एकरात गांजा लावण्याची परवानगी द्या… अन्यथा….

News Desk