HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीला गळती, मुलाखतीला ‘या’ आमदारांनी पाठ फिरवली

मुंबई । राष्ट्रवादीचे माजी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अहिर यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शुक्रवारी (२६ जुलै) पक्षाचा आणि त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून येत्या ३० जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. तसेच चित्रा वाघ यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादींने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत घेण्यास सुरुवात केली. या मुलाखतीत राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी पाठ फिरवली आहे.

कालिदास कोळंबकर यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. कोळंबकर यांनी यापूर्वीच भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. राष्ट्रवादींने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत घेण्यास सुरुवात केली आहे. या मुलाखतीत राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी पाठ फिरवली आहे. यात पक्षाचे बार्शीतील विद्यमान आमदार दिलीप सोपल आणि माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे दोघे शिवसेनेत जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच अहमदनगरचे संग्राम जगताप यांनी दांडी मारली. परंतु शिंदे आणि सोपल हे दोघे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. मात्र पवार सोलापुरात असताना उपस्थित नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.

या आमदारांबरोबरच विधानपरिषदेचे सभापती राम राजे नाईक निंबाळकर देखील पक्षावर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. श्रीवर्धवचे आमदार अवधुत तटकरे, उल्हासनगरच्या ज्योती कलानी, गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे देखील शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत राष्ट्रवादीला उमेदवार मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार घेत असलेल्या मुलाखतींना पक्षाचे विद्यमान आमदार गैरहजर राहत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीड पोलीस दलासाठी वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते संपन्न!

News Desk

भाजपच्या मराठी प्रेमाविषयी प्रशनचिन्ह,बेळगांव निवडणुकीवर राऊतांनी खडसावलं !

News Desk

कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादचे नामांतर होणारच – संजय राऊत

News Desk