HW News Marathi
Covid-19

…म्हणून विरोधकांना पोटदुखी, हे कोरोनाचे लक्षणेही असू शकते !

मुंबई | “बाहेर कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये माझी निवड केली. कदाचित हेच विरोधकांच्या पोटदुखीचे कारण असू शकते आणि पोटदुखी हे देखील कोरोनाचे लक्षण असू शकते”, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. शिवसेना नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या अनलॉक मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. आता या टीकेला फडणवीसांकडून काय उत्तर येणार हे महत्त्वाचे.

“आपल्या शरीरात एखादा वेगळा, अनपेक्षित असा बदल झाला तर ते कोरोनाचे लक्षण असू शकते. कोरोनाच्या लक्षणांमध्ये पोटात दुखणं, तोंडाची चव जाणं अशीही वेगवेगळी लक्षणे आहेत. त्यातच, राज्यात सत्तापरिवर्तन झाल्याने सध्या अनेकांचे आयुष्य बेचव झालेले असण्याची शक्यता आहे”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी आपल्या या मुलाखतीत प्रत्युत्तरे दिली आहेत.

देवेंद्र फडणवीस काहीच दिवसांपूर्वी दिल्लीला जाऊन आले आहेत. याबाबत मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि, ” देवेंद्र फडणवीस दिल्लीत कोरोनास्थितीची पाहणी करण्यासाठी गेले असतील. फडणवीसांना दिल्लीचीच अधिक चिंता आहे. सध्या ते प्रत्येक गोष्ट दिल्लीत करतात. फडणवीसांनी महाराष्ट्रातील आमदारांचा फंड देखील दिल्लीसाठीच दिला.” कोरोना काळात महाराष्ट्र भाजपने सातत्याने राज्याच्याविरोधी आणि केंद्राच्या समर्थनार्थ भूमिका ठेवल्याने टीका झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कापूस खरेदी केंद्रांना सहकार्य करा, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचना

News Desk

नव्या सरकारी योजनांबाबत केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय 

News Desk

“आधी कुंभमेळ्याची चूक, नंतर चारधाम यात्रा…”, उच्च न्यायालयानं उत्तराखंड सरकारला खडसावलं!

News Desk