HW News Marathi
महाराष्ट्र

“पवारांनीच मागील ५० वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा घात केला!”

मुंबई | ‘शरद पवार यांनीच खऱ्या अर्थाने मागील ५० वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा घात केला. मात्र, आजपर्यंत पवारांच्या संघटनेनं एसटी कर्मचाऱ्यांचे मूळ प्रश्न राज्य सरकारसमोर कधी मांडेलच नाहीत, अशी टीका भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केली आहे. पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावरून शरद पवारवर टीकास्त्र सोडलं.

पडळकर ऐवढ्यावरच थांबले नाही तर ते पुढे म्हणालं, “जर एसटी कर्मचाऱ्यांचं प्रश्न सुटलं तर त्यांची संघटना उणार नाही. आणि निवडणुकीच्या वेळी कर्मचाऱ्याचा वापर करता येणार नाही,” अशी टोलाही पडळकरांनी पवारांना लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. एसटी महामंडळाचं राज्यात विलीनीकरण करत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका कर्मचाऱ्यांची आहे. सध्या एसटी कर्मचारी हे सध्या मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. या आंदोलनात भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत कर्मचाऱ्यांसोबत आंदोलन करत आहेत.

रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोटीस

राज्य सरकार हे कर्मचाऱ्यांच्या संपावर मार्ग काढण्याऐवजी त्यांना भीती दाखवण्याचं काम करत असून रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवा नोटीस पाठवत आहे. कर्मचारी सरकारला सहकार्य करायला तयार आहेत. परंतु, सरकारला एसटीचे विलीनकरणाच्या मुद्द्यावर बोलयाचं नसेल. तर यातून मार्ग कासा निघेल?, तसेच फडणवीसांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग कसा निघू शकतो. यासंदर्भात परिवहन मंत्र्यांना मार्गदर्शन देखील केलेलं आहे. म्हणजे आम्ही केवळ भांडत नाही, तर प्रश्नावरील उत्तर देखील देतो. यातून मार्ग काढायचा की नाही काढायचा हे आता सरकारच्या हातात, असे पडळकरांनी माध्यमांशी बोलताना म्हणालं.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अहमदनगर-सोलापूर राष्ट्रीय मार्गावर अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू

News Desk

‘हॉटेल, रेस्टोरंट, मॉलबाबत विचार करुन निर्णय घेऊ’- अस्लम शेख

News Desk

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत भाजप नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार

News Desk