HW News Marathi
महाराष्ट्र

मला शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करायाचे !

औरंगबाद | “शेतकऱ्यांना कर्जमुक्त मी नक्कीच करणार, पण कर्जमुक्त झाल्यानंतर त्याला मला चिंतामुक्त करायचे आहे,” असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज (९ जानेवारी) औरंगबादमध्ये ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०२०’चे उदघाटन यांच्या हस्ते करण्यात आले. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले की, “आताचे सरकार असे आहे की, तुम्हाला तुमच्या पायावर खंबीरपणे उभे करणारे हे सरकार आहे. हे शेतकऱ्यांचे सरकार असून मला राज्यातील शेतकऱ्यांना केवळ कर्जमुक्त नक्कीच करणार आहे. त्याचबरोबर त्यांना कर्जमुक्त झाल्यानंतर मला चिंतामुक्त करायचे आहे.”

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “आपल्याकडे जे कौशल्य आहे, जी बुद्धिमत्ता आहे, त्याचा योग्य वापर आपण करू शकलो तर संपूर्ण जगाची बाजारपेठ जिंकू शकू एवढी हिंमत, ताकद आणि कौशल्य माझ्या हिंदुस्थानात, माझ्या मराठवाड्यात नक्कीच आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजपासून दोन दिवसाच्या औरंगाबाद दौऱ्यावर असून ते दोन दिवस औरंगबाद सह, लातूर ,उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्याच्या विभागीय आयुक्त कार्यलयात आढावा बैठक घेणार आहेत. औरंगाबादमधील औद्योगिक प्रदर्शनीचे उदघाटन करून ते दौऱ्याला सुरुवात केली.

महाराष्ट्र राज्यातील उद्योगाची सद्यस्थिती पाहता महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही, असा विश्वास देखील मुख्यमत्र्यांनी कार्यक्रमादरम्यान व्यक्त केला आहे. ‘कृषी आणि उद्योग यांची सांगड घालत राज्यात आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचा या सरकारचा कटिबद्ध आहे. मंदी आली म्हणून रडत बसणारा महाराष्ट्र नाही आणि ही महाराष्ट्राची परंपराही नाही महाराष्ट्राला रडण्याची नव्हे, तर लढण्याची परंपरा आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनाने समन्वय ठेवावा! – मुख्यमंत्री

Aprna

धान्यवाटप विनातक्रार होण्यासाठी पालकमंत्र्यांनी व्यक्तीश: लक्ष घालून जबाबदारी घ्यावी

News Desk