HW News Marathi
महाराष्ट्र

जयंत पाटलांचे ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण!

मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हटलं आहे. यावरुन सोशल मिडीयात आणि लोकांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. यावर स्वत: जयंत पाटील यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे. इस्लामपूर येथील एका स्थानिक माध्यमाला मी दिलेल्या मुलाखतीचे जसेच्या तसे वार्तांकन लोकमत मध्ये आलेले असून, माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करू नये हि विनंती, असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.

काय म्हणाले होते जयंत पाटील?

“आमच्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद सध्या नाही. प्रत्येक राजकारण्याला जशी इच्छा असते तशी माझीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. पण पक्ष आणि शरद पवार जो निर्णय घेईल तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इतका काळ काम करणाऱ्या माझ्यासारख्या नेत्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असू शकते. त्यामुळे माझी जबाबदारी माझी मतदारी आहे. यासाठी संख्या वाढली पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे. ती संख्या जर वाढली आणि मोठा पक्ष झाला तर मग शरद पवार जो निर्णय देतील तो मान्य असेल”, असं जयंत पाटील यांनी या मुलाखतीतून स्पष्ट केलं आहे. पुढे त्यांना असंही विचारलं की अजित पवार, सुप्रिया सुळे यापैकी समर्थन कोणाला द्याल, त्यावर ते म्हणाले की, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकच आहेत. पवारसाहेबांच्या घरातील त्या व्यक्ती आहेत त्या एकच आहेत त्यामुळे त्यांना वेगळं समजण हीच मुळात चुक आहे, असं पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साकीनाका बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांसाठी सरकारकडून २० लाखांची मदत जाहीर!

News Desk

#COVID19 : राज्यातील कोरोनाबाधिताचा आकडा ६६१ वर, नव्या २६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

News Desk

गेल्या ६ महिन्यात माझ्यावर १० अग्रलेख, मला इतकं महत्व राऊत का देतायत?

News Desk