HW News Marathi
महाराष्ट्र

‘एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने, भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करतेय’

मुंबई | एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पध्दतीने अडकवत आहेत. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही त्यामुळे चौकशीतून ते बाहेर येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीला बोलावल्यानंतर जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांच्याविरोधात हे कुभांड रचले जात असल्याचा आरोप केला आहे.

एकनाथ खडसे यांच्यावर ज्या विषयावर कारवाई सुरू आहे त्यात तथ्य अद्याप आढळलेले नाही. किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. एक जागा त्यांनी रितसर घेतली त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. पण त्यामध्ये कुभांड रचून या सर्व एजन्सीमार्फत राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. भाजपचा एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यावर फार जुना राग आहे. एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये फार वाढू दिले गेले नाही. ओबीसी नेतृत्वाला बाजुला करण्यात आले असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

भोसरी येथील एमआयडीसी भूखंड घोटाळाप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश चौधरी, यांच्यासह इतरांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. खडसे यांच्यावर पदाचा दुरुपयोग करून हा जमीन व्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर, ही जमीन शारदा खडसे यांच्या नावावर असून आर्थिक व्यवहाराबद्दलही त्यांच्यावर आरोप आहेत.

भाजपला रामराम करत एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये आले होते. यानंतर ईडीने भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी एकनाथ खडसे यांना नोटीस बजावली. पुढे ईडीने तपास सुरू ठेवला. ईडीने खडसे यांचे जावई चौधरी यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावले होते. रात्री उशिरापर्यंत चौधरी यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यशवंत जाधवांच्या डायरीतल्या ‘मातोश्री’ उल्लेखावर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण

News Desk

मायमराठीतील साहित्यकृतींना राष्ट्रीय सन्मान मिळणे अभिमानास्पद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Aprna

राज्यात काल 3,063 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

News Desk