HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधानांमध्ये अधिवेशन घेण्याची हिंमत आहे की नाही?, जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

पुणे | महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल आहे. पण आता चंद्रकांत पाटील यांनाच स्वप्ने बघण्याचा छंद आहे, त्यावर मी काय बोलणार?,अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. “महाराष्ट्र झोपेत असतानाच महाविकास आघाडी सरकार जाईल. कळणारचं नाही, कधी गेलं,” असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला डिवचलं होतं.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या विधानासह मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे जलसंधारण मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपावर पलटवार केला. पाटील यांनी विधानावर “महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व आलबेल आहे. चंद्रकात पाटील यांना स्वप्न पडण्याचा छंद आहे. त्यावर मी काय बोलणार?,” असं म्हणत जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे.

चंद्रकात पाटील यांना स्वप्न पडण्याचा छंद आहे. त्यावर मी काय बोलणार?

जलसंधारण मंत्री जयंत पाटील हे आज (२८ मे) पुण्यात बैठकीसाठी आले होते. साखर संकुलात झालेल्या बैठकीनंतर बोलताना जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर पलटवार केला. महाविकास आघाडी सरकारवर चंद्रकांत पाटील सतत विधानं करीत आहे, असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व आलबेल आहे. चंद्रकात पाटील यांना स्वप्न पडण्याचा छंद आहे. त्यावर मी काय बोलणार?,” असा टोला लगावला.

पंतप्रधानांमध्येही अधिवेशन घेण्याची हिमंत आहे की नाही?

‘राज्याचं अधिवेशन घेण्याची यांच्यात हिम्मत नाही’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. पाटील यांच्या विधानांवर जयंत पाटील यांनी टीकास्त्र डागलं. “पंतप्रधान मोदी यांच्यात देखील अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे की नाही. यावर चर्चा होऊ शकते. कोरोना असल्याने लोकप्रतिनिधी येऊ शकत नाही. संख्या वाढल्याने अधिवेशन आपण मर्यादित केले आणि तेच कारण राज्याला लागू आहे. सर्व राज्यात हीच परिस्थिती आहे,” असं जयंत पाटील म्हणाले. कोरोना आहे त्यामुळे पंतप्रधान आणि लोकसभेचे सदस्य एकत्र येऊ शकत नाहीत. हीच परिस्थिती देशातील सर्व राज्यांना लागू आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आपण अधिवेशन घेणं थांबवलं आहे, असं ते म्हणाले.

लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील

यावेळी त्यांनी लॉकडाऊनवरही भाष्य केलं. लॉकडाऊनबाबत वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळी रणनीती ठरवावी लागेल. कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही. पण परिस्थिती थोडी बरी आहे. मात्र लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असंही ते म्हणाले आहेत.

पदोन्नतीतील आरक्षणावर मतभेद नाही

पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोणतेही वाद नाहीत. कोर्ट, कचेरी आणि कायद्याच्या स्तरावर काही निर्णय झाले आहेत. त्यातून मार्ग कसा काढायचा याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजितदादा पदोन्नतीतील आरक्षणाच्या विरोधात असल्याचं चित्रं रंगवलं जात आहे. काही लोक हे काम करत असून हे दुर्देवी आहे. या मुद्दयावरून सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. याबाबत कायद्याचा अभ्यास करून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहूनच काम करावे लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मराठा आरक्षणाप्रश्नी संभाजीराजे अग्रेसर – जयंत पाटील

यावेळी त्यांनी भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांच्या मराठा आरक्षणाच्या दौऱ्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही संभाजीराजेंची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. राज्यातील सर्व मराठा नेत्यांनी आरक्षण मिळावा म्हणून प्रयत्न सुरू केला आहे. त्यात संभाजीराजे अग्रेसर आहेत. पण हा प्रश्न केंद्राच्या हातात आहे. लोकसभेत घटना दुरुस्ती करून निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी सर्वांना भेटून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत भूमिका पोहोचवण्याचं काम संभाजीराजे करत आहेत, असं ते म्हणाले. चंद्रकांत पाटील म्हणतात ते सर्व खरं असतं असं नाही. त्यामुळे त्यावर भाष्य न केलेलं बरं. मराठा आरक्षणाचा प्रश्न जटील आहे. तो सुटायला हवा, असा सगळ्यांचाच आग्रह आहे, असंही ते म्हणाले.

उजनी धरणाच्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले…

“उजनी धरणाच्या पाणी प्रश्नावर पाटील म्हणाले, “सोलापुरकरांच्या उजनी धरणाच्या पाण्यावर जेवढा हक्क आहे. तो कोणीही हिरावून घेणार नाही. सोलापूर जिल्ह्याचा वाटेचं पाणी कुठेही जाऊ देणार नाही,” अशी माहिती त्यांनी दिली. “पॉझिटिव्ह रेट अनेक ठिकाणी खाली गेलेला आहे. जोपर्यंत हा रेट कमी होत नाही. तोपर्यंत संकट टळले असं म्हणता येणार नाही. तसेच ३० तारखेपर्यंत परिस्थिती बघून लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय मुख्यमंत्री निर्णय घेतील,” असंही पाटील यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम, मानसोपचाराची आवश्यकता, प्रवीण दरेकरांची टीका

News Desk

“मी जर त्यांचा पुत्र असतो तर येऊच दिलं नसतं”, राणेंचा शिवसेनाला खोचक टोला

News Desk

पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Manasi Devkar