HW News Marathi
Covid-19

पीएम केअरच्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची चौकशी व्हावी – जयंत पाटील

मुंबई | पीएम केअरच्या माध्यमातून मिळालेल्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्रसरकारवर हल्ला चढवला आहे.

पीएम केअरच्या माध्यमातून मराठवाड्याला मिळालेल्या १५० व्हेंटिलेटरपैकी ११३ व्हेंटिलेटर निकामी निघाले असल्याचे समजते आहे तसेच मुंबई उच्च न्यायालयाने केंद्राला याबाबत उत्तर देण्यास सांगितले असल्याचीही बातमी आहे. यावरून मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पीएम केअरच्या माध्यमातून मराठवाड्याला मिळालेल्या १५० व्हेंटिलेटरपैकी ११३ व्हेंटिलेटर निकामी निघाल्याची बातमी ऐकली. यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्न उपस्थित झाला आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. या मागचा सुत्रधार कोण ? कोण गैरफायदा घेत आहे ? याचा छडा लागायला हवा असेही जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

 

काँग्रेसची टीका

काँग्रेसने पीएम केअर्स फंडातील व्हेंटिलेटर खराब असल्याचा दावा केला होता. पीएम केअर फंडातून दिलेले व्हेंटिलेटर्स तकलादू आहे. त्यासंदर्भात सुरु असलेली सारवासारवही उघड झाली आहे. औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या 17 मेच्या अहवालानं केंद्र सरकार, तसंच गुजरात भाजपच्या नेत्यांच्या जवळच्या ज्योती सीएनसी कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न उघडा पडलाय. अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयानं स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानुसार केंद्र सरकारनं पीएम केअर फंडातून राज्याला दिलेल्या सर्व व्हेंटिलेटर्सची तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती.

‘फडणवीस, पाटलांनी व्हेंटिलेटर चालू करून दाखवावे’

पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला केंद्र सरकारने दिलेले ज्योती सीएनसी कंपनीचे व्हेंटिलेटर्स पूर्णतः तकलादू असल्याचे अहवाल सांगतो. मोदींची प्रतिमा जनतेच्या जीवापेक्षा महत्वाची मानणाऱ्या फडणवीसजी आणि चंद्रकांत पाटील यांनी हे तकलादू व्हेंटिलेटर चालू करून दाखवावे असे आमचे आव्हान आहे, असं ट्वीट सावंत यांनी केलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक | महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ११ हजारांपेक्षा कमी रूग्ण

News Desk

दिल्ली सरकार मद्यावरील ७० टक्के कोरोना शुल्क १० जूनपासून हटविणार

News Desk

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये ११ जिल्ह्यातील प्रवाशांना बंदी

News Desk