HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट

मुंबई | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी श्रीमती जाधव यांचे अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्याच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांनीही यावेळी श्रीमती जाधव यांना शुभेच्छा दिल्या.

या भेटी प्रसंगी गृहराज्यमंत्री सतेज तथा बंटी डी. पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, शिवसेनेचे पदाधिकारी अरूण दुधवडकर, संजय पवार, विजय देवणे आदी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव, मी तुझी शिक्षिका, आमच्या वृद्धाश्रमाचं नुकसान झालंय, बाळा भेट मला, मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेची हाक

News Desk

राणा दाम्पत्यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा नाही; 29 तारखेपर्यंत कारागृहातच रहावे लागणार

Aprna

शेतकऱ्यांना शेतीसाठी अखंडितपणे वीज पुरवठा करण्यात यावा! – दादाजी भुसे

Aprna