HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापुरात जयश्री जाधव यांचा विजय; परळीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष!

बीड | कोल्हापूर विधानसभा पोट निवडणुकीचा नुकताच निकाल जाहीर झाला असून यामध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला असल्याने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे तर राज्याचे सामजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचा मतदार संघ असलेल्या परळीत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख व परळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष बहादुर भाई यांच्या नेतृत्वाखाली फटाके वाजवून व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.

परळी येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत नारे देण्यात आले. यामध्ये “कोल्हापूर तो झाकी है, अभि महराष्ट्र बाकी है!”, असं नारे देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस

राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात अत्यंत टोकाचे राजकारण सुरू असल्याचं सर्वांनीच पाहिलं होतं. आणि त्याचीच प्रचिती कोल्हापुरातही आली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती मात्र बाजी ही काँग्रेसने मारली.

या पोट निवडणुकीच्या काळात दोन्ही बाजूने मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा तर सुरू होत्याच पण त्याबरोबरच स्थानिक मुद्द्यापासून ते राज्यातील मुद्द्यांवर फोकस करण्यात आला होता. सबंध राज्याचे लक्ष या पोट निवडणुकीकडे लागले असल्याने ही लढत चांगलीच चुरशीची व प्रतिष्ठेची होती. आणि आज मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवार यांनी विजय मिळवून भाजपला मात केल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीमा कोरेगाव इतिहास शाळांमध्ये शिकवण्यासाठी शिक्षणमंत्र्यांना रामदास आठवले पत्र लिहिणार

News Desk

राजकीय स्वार्थासाठी छत्रपतींवर दबाव टाकण्याचे पाप चंद्रकांत पाटलांनी करू नये,काँग्रेसचा इशारा !

News Desk

मुंबईत ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात !

News Desk