HW News Marathi
महाराष्ट्र

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांचा पुढाकार; देखभाल-दुरुस्तीच्या कामातून अखंडित विजेचा प्रयत्न

कल्याण | देखभाल-दुरुस्तीच्या कामातून अखंडित वीज पुरवठा तसेच ग्राहकांशी संवाद या उद्देशाने कल्याण परिमंडलात ‘एक गाव, एक दिवस’ हा उपक्रम सुरु झाला आहे. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या पुढाकारातून या उपक्रमांतर्गत शहरी भागात ‘एक दिवस, दहा रोहित्रे’ ही संकल्पना राबविण्यास १ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. यात प्रत्येक उपविभागात दर आठवड्याला दहा रोहित्रांची (डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर) निवड करून अधिक मनुष्यबळाच्या मदतीने एका दिवसात या रोहित्रांच्या देखभाल दुरुस्तीची सर्व कामे केली जात आहेत. यातून संबंधित रोहित्रावरील वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा होण्यास मदत मिळेल.

कल्याण परिमंडलांतर्गत पालघर व ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रमातून वीज वितरण यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसह नवीन वीजजोडणी व वीजबिलांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येते. या उपक्रमाचा शहरी वीज ग्राहकांनाही लाभ मिळावा, या हेतूने यात आता ‘एक दिवस, दहा रोहित्र’ या संकल्पनेची भर टाकण्यात आली आहे. यात रोहित्रातील तेलाची पातळी तसेच अर्थिंग तपासणे, पिन व डिस्क इन्सुलेटर बदलणे, वितरण पेट्यांची आवश्यक दुरुस्ती व स्वच्छता, किटकॅट बदलणे, अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या व वेली दूर करणे याशिवाय आवश्यक त्या ठिकाणी तारा सरळ करणे व तारांमध्ये स्पेसर्स बसविणे आदी कामे सुरु आहेत. या उपक्रमात शहरी भागातील सर्वच वीज वितरण रोहित्रांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जेणेकरून संबंधित रोहित्रांवरील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यास मोलाची मदत मिळेल.

कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, वसई, विरार, बोईसर, अंबरनाथ, बदलापूर, पालघरसह परिमंडलातील सर्वच शहरी भागात हा उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत कल्याण पश्चिमेत सुरु असलेल्या कामांची नुकतीच पाहणी करून मुख्य अभियंता अग्रवाल यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. मुख्य अभियंता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंते सुनील काकडे, सिद्धार्थ तावडे, राजेशसिंग चव्हाण व किरण नगांवकर यांच्या टीमकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी राजीनामा देतो, साताऱ्यात पुन्हा निवडणूक घ्या !

News Desk

जे.जे.रुग्णालयातील ‘कोरोना’च्या चाचणी व उपचारासाठी तयारी पूर्ण !

swarit

परळी महसूल प्रशासनाच्या विरुद्ध कॉंग्रेस आक्रमक; नायब तहसीलदारांच्या दालनात बेशरम फेकून आंदोलन!

News Desk