HW News Marathi
देश / विदेश

कर्नाटक सरकारने सूचना स्वीकारली ! जयंत पाटलांची माहिती

सांगली । कर्नाटकच्या प्रशासनाने तातडीने अलमट्टी धरण परिसरात रियल टाइम डेटा सिस्टिम बसवली पाहिजे. अशी मागणी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे केली जयंत पाटील आणि कर्नाटकचा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली या बैठकीत जयंत पाटलांनी ही मागणी केली.

पश्चिम महाराष्ट्र आणि सांगली सातारा कोल्हापूरमधील महापुराच संकट टाळण्यासाठी ही भेट येडियुरप्पा यांच्यासोबत झाली. कोल्हापूर सातारा सांगली या भागात झालेल्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकार आधीच उपाययोजना करते.महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने हे करणे आवश्यक आहे. २०१९ महाराष्ट्रमध्ये पूर आल्यावर कर्नाटक सरकार ने पाणी सोडल्यानंतर सांगली कोल्हापूरमधील पाणी ओसरलं होत. पण तोपर्यंत या भागात मोठं नुकसान झालं होतं.

जलसंपदा विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना घेऊन ही चर्चा झाली कृष्णा नदीचा महापूर आणि त्यातून अलमट्टीच्या पाण्याचे नियोजन, महाराष्ट्रातल्या कृष्णा खोऱ्यातील व कर्नाटकच्या कृष्णा खोऱ्यातील जनतेला जे नुकसान सोसावे लागते त्यापासून कमीत कमी कसं नुकसान होईल आणि पूरनियंत्रणाचं काम दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल यादृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. यापूर्वी सचिव स्तरावर बैठक पार पडली आहे आणि आता मंत्री स्तरावर होत आहे. शेजारील राज्याशी संवाद चांगला कसा होईल हा प्रयत्न असणार आहे, असेही त्यांनी सांगितलं होतं.

कर्नाटक-महाराष्ट्र राज्यांमध्ये काही मुद्द्यांवर अनेक मतभेद जरुर आहेत. परंतू, असे असले तरी मानवतेच्या दृष्टीने महापूरासारखे संकट टाळण्यासाठी दोन्ही राज्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेतील अशी आशा आहे.पूर नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा करुन, महापुराचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांचा अंत न पाहता शेतकऱ्यांशी संवाद साधायला हवा-  रोहित पवार

News Desk

वडेट्टीवार खाजगीत मराठा समाजाला ओबीसीत घेण्याचा सल्ला देतात अन् ! संभाजीराजेंची टीका

News Desk

प्रसिध्द पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन

News Desk