HW News Marathi
महाराष्ट्र

करुणा मुंडे प्रकरण! सापडलेल्या पिस्तुल प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल


बीड | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात कथित आरोप केलेल्या करुणा मुंडे- शर्मा यांच्या वाहनामध्ये पिस्तूल सापडल्या प्रकरणी चालक दिलीप पंडित यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती बीड पोलीस अधीक्षक आर राजा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे शर्मा यांनी आपले शोषण होत असल्याचे आरोप केले आहेत. याप्रकरणी सगळी माहिती देण्यासाठी रविवारी करुणा मुंडे बीड जिल्ह्यात परळी येथे आल्या होत्या, मात्र येथे आल्यानंतर महिला कार्यकर्त्यांनी करुणा मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत एट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात फिर्याद दिली. त्यानुसार करुणा मुंडे यांच्या विरोधात ऍट्रॉसिटीचा तर त्यांचे वाहन चालक दिलीप पंडित यांच्या विरोधात विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी परळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


रविवारी जेव्हा करुणा मुंडे परळी दाखल झाल्या तेव्हा अनेक महिला कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी करुणा मुंडे यांच्या वाहना भोवती गर्दी केली होती. याच दरम्यान करुणा मुंडे यांच्या वाहनाची डीगी खोलून काहीतरी वस्तू गाडीत फेकल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. गाडीत वस्तू टाकणारा तो व्यक्ती कोण? याचे उत्तर बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा देऊ शकले नाहीत. पिस्तूल कुठून आली वर कोणी टाकली याचा तपास सुरू असल्याचेही राजा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

करुणा मुंडे या रविवारी परळी मध्ये आल्यानंतर पोलिसांनी करुणा मुंडे यांच्या वाहनाची तपासणी केली यामध्ये पोलिसांना पिस्तूल आढळून आले होते परंतु या प्रकरणात तथ्य नसून मला खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवले जात असल्याचे देखील करुणा मुंडे शर्मा यांनी म्हटलेले आहे.

करुणा मुंडे प्रकरणाच्या तपासाकडे जिल्ह्याचे लक्ष

रविवारी दिवसभर करुणा मुंडे शर्मा प्रकरणात ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. घटनेच्या नंतर 24 तास उलटून देखील ती पिस्तूल कोठून आली.? ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्याबाबत एवढी घाई कशासाठी केली? याचे समाधानकारक उत्तर पोलीस अधीक्षक आर राजा यांच्याकडून मिळालेले नाहीत. यामुळे करुणा मुंडे- शर्मा प्रकरणाचा तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. सावंत यांच्या पुस्तकांनी दिला जंगलभ्रमंतीचा सुंदर अनुभव! – उद्धव ठाकरे

Aprna

मिलिंद एकबोटे यांना गोरक्षकांकडून मारहाण

News Desk

“माझ्या पती आणि सासूच्या देहावर उभे राहिलेले रिपब्लिक चॅनेल बंद झाले पाहिजे”, अक्षत अन्वय नाईक यांची मागणी

News Desk