HW News Marathi
महाराष्ट्र

“2024मध्ये भाजपचं एकच इंजिन असेल एवढं ध्यानात ठेवा” देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!

पुणे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठींचा सिलसिला गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे मनसे-भाजप युती होण्याच्या चर्चेने जोर धरलेला असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत आमचं एकच इंजिन असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पाटील-राज यांची भेट निष्फळ ठरलीय का? असा सवाल केला जात आहे.

2024मध्ये भाजपचं एकच इंजिन असेल

देवेंद्र फडणवीस आज पुण्यात आहेत. त्यांनी पुण्यातील मेट्रो कामाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. मनसे आणि भाजप एकत्र येणार आहे का? असा सवाल फडणवीसांना करण्यात आला. त्यावर 2024मध्ये भाजपचं एकच इंजिन असेल एवढं ध्यानात ठेवा, असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे मनसे-भाजप युती होणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

दिल्लीला जाणार

यावेळी फडणवीस यांनी दिल्लीत जाणार असल्याचंही सांगितलं. दिल्लीत भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील दिल्लीत गेले आहेत. तर पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार हे भाजप नेते सोमवारी दिल्लीत जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या या दिल्लीवारीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तिसरी पिढी राजकारणात येत असेल तर चांगली गोष्ट

यावेळी त्यांना तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याचं सांगितलं गेलं. त्याचं त्यांनी स्वागत केलं. ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात येत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यांनीही राजकारणाचा अनुभव घेतला पाहिजे. परंपरेने नेतृत्व येत असेल तर त्या नेतृत्वाकडे अशा प्रकारच्या जबाबदाऱ्याही येतील, असं ते म्हणाले.

दिल्लीत भाजपची खलबतं

दिल्लीत भाजपची एक बैठक पार पडणार असल्याचं सांगितलं जातं. भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य दिल्लीत दाखल झाले आहेत. आता देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार ही दिल्लीत दाखल होणार आहेत. जयकुमार रावल, राम शिंदे आणि संजय कुटेही दिल्लीत आल्याने भाजपची बैठक होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारने सुरक्षा पुरवली, किरीट सोमय्यांभोवती 40 CISF जवानांचं सुरक्षा कवच!

News Desk

मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाविकासआघाडी सरकारने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

Aprna

पालघरमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ, वोटिंग मशीनमध्ये बिघाड

News Desk