HW News Marathi
महाराष्ट्र

ध्येय मोठे ठेवल्यास यशापर्यंत पोहोचता येते !

सांगली | जीवनात अपयश आले म्हणून आपण खचून जाऊ नये प्रामाणिक प्रयत्न करावा. ध्येय मोठे ठेवल्यास ध्येयापर्यंत पोहचता येते असे मत आय. ए.एस. अधिकारी गणेश टेंगले यांनी व्यक्त केले आहे. बाबरवस्ती पांडोझरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत आय.ए.एस. पदी निवड झाल्याबद्दल सत्कार सभारंभ कार्यक्रमात बोलत होते . स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने हा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, जिद्दीने अभ्यास केला एक ध्येय ठेवून तीन वर्षे मेहनत केली. जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण झाले.आज कितीही वेगवेगळ्या शाळा निघाल्या तरी मोफत व गुणवत्ता पूर्ण शिक्षण जर गोरगरिबाच्या मुलांना मिळायचे असेल तर सरकारी शाळा हा एकमेव पर्याय आहे.

जत सारख्या दुष्काळी भागातून आल्याने आजूबाजूची परिस्थिती माहीती होती. त्याचा फायदा झाला.घरची परिस्थिती बरी होती वडील ऊस तोडणी मुकादम आहे. आई,भाऊ, कुंटुबाचे प्रोत्साहन मिळाले असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सविता मोटे, केरुबा गडदे,नेताजी टेंगले,रियाज जमादार, मुख्याध्यापक दिलीप वाघमारे, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रवादी-भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याची पंतप्रधानांनी दिली ऑफर; शरद पवारांनी केला खुलासा

Aprna

… लोकांना उल्लू बनविण्याचे धंदे करत आहात!; जलीलांची राज्य सरकारच्या मराठी पाट्यांवर टीका

Aprna

ऊसतोड मजुरांना अडवल्यामूळे आमदार सुरेश धस यांना अटक, तर गुन्हा नोंदवून जामिनावर सुटका

News Desk
राजकारण

अशोक गेहलोत यांनी घेतली राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

News Desk

नवी दिल्ली | राजस्थानमध्ये आज (१७ डिसेंबर) अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. गेहलोत यांनी तिसऱ्यांदा राजस्थानचे मुखमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राजस्थानसह मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये आज मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार होणार आहे. राजस्‍थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी गेहलोत आणि पायलट यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

राजस्थानमध्ये शपथ विधी सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा, कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुला अनेक नेत्यांनी हजेरी लावली. काँग्रेसच्या शपथविधी सोहळ्यात भाजपच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांच्या हजेरीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेहलोत यांनी १९९८ मध्ये पहिल्यांदा तर २००८ मध्ये दुसर्‍यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्‍हणून कार्यभार सांभाळला होता. तर उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे राजस्‍थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. ते लोकसभेचे खासदार आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.

Related posts

“महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात कायदा सुव्यवस्थेसाठी केंद्रीय सुरक्षा दल पाठवा”, संजय राऊतांची मागणी

Aprna

विधानसभा अध्यक्षांनी ऋतुजा रमेश लटकेंना दिली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

Aprna

अल्पसंख्यांकांच्या एकजुटीचा नेता पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री होऊ शकतो !

Gauri Tilekar