HW News Marathi
महाराष्ट्र

“माशा मारण्याची स्पर्धा दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे”, भाजपचा राष्ट्रवादीला पलटवार

मुंबई | मराठा आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्यानंतर आता केंद्र सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, त्यासोबतच केंद्रानं ५० टक्क्यांवरच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील विचार करावा आणि याचिका करावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे.

यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर परखड शब्दांत टीका करत, “सगळं केंद्रानं करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या आणि मिळालेलं आरक्षण घालवायचं हे किती दिवस चालणार?” असा सवाल केला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसेच प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. आता नवाब मलिकांना भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले केशव उपाध्ये?

“माशा मारण्याचा अर्थ कदाचित नवाब मलिक यांना ठावूक नसावा किंवा कळून वळत नसावा. माशा मारण्याची स्पर्धा तर गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे. सत्ताधारी घरात लपून आहेत आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस प्रत्येक जिल्ह्यात प्रवास करता आहेत.” असं केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

तसेच, “आता ज्या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहात, तेथे तरी किती वेळा गेलात? १० बालकांचे हत्यारे अजून का मोकळे आहेत? बाकी तुम्ही लोकांचे जीव वाचविण्यासाठी काम करताहात की गेलेले जीवांचे आकडे लपविण्यासाठी हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतो आहेच!” असं देखील उपाध्ये यांनी नवाब मलिक यांना उद्देशून म्हटलं आहे.

काय म्हणाले होते नवाब मलिक?

फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेला नवाब मलिक यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे. आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजप माशा मारणे स्पर्धाही भरवा! असा सल्लाही नवाब मलिक यांनी भाजपला दिला आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. प्रत्येक गोष्टीत राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. राज्यांनी ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवणं थांबवलं पाहिजे. सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला घेरले. 102व्या घटना दुरुस्तीत राज्यांचे अधिकार अबाधित ठेवण्यात आल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने तात्काळ कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करून आपलं म्हणणं मांडलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे आभारीच आहोत, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांच्या एकत्र पुतळ्याने शहराच्या वैभवात वाढ! – दत्तात्रय भरणे

Aprna

वाटेल ती किंमत मोजू,पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवू, हसन मुश्रीफांचा शब्द

News Desk

“उद्धव ठाकरेंसारखा स्वातंत्र्य देणारा मुख्यमंत्री लाभला हे माझं नशीब”

News Desk