HW News Marathi
महाराष्ट्र

किरीट सोमय्या म्हणतात,’आगे आगे देखो होता है क्या’, देशमुख, परबांनंतर आता जितेंद्र आव्हाडांचा नंबर

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मंत्र्यांवर पुन्हा एकदा हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. अनिल देशमुखांनंतर आता अनिल परब यांचा नंबर लागला असून पुढचा नंबर जितेंद्र आव्हाडांचा असल्याचं सोमय्या म्हणाले. सरकारमधल्या विविध मंत्री आणि शिवसेनेच्या नेत्यांवर यावेळी सोमय्या यांनी गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळालं आहे.

सचिन वाझेवर झालेल्या कारवाईत पाच अधिकारी निलंबित झाले आहेत. परमबीर सिंग घरी गेले, अनिल देशमुखांना तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. आता सध्या अनिल परबांचा नंबर असून त्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा नंबर असेल असा दावा सोमय्यांनी केला. भाजप उद्धव ठाकरे सरकारमधला भ्रष्टाचार पूर्णपणे बाहेर काढेल, असंही सोमय्या म्हणाले. राज्यातील सरकारनं खुशाल पाच वर्षे पूर्ण करावी. पण मंत्री आणि नेत्यांकडून होणारे भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम करणार असल्याचं सोमय्या म्हणाले.

यावेळी सोमय्या यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांना 55 लाख रुपये परत करावे लागले आहेत. मुंबईच्या महापौरांनी एसआरए चे गाळे ढापल्याचं हायकोर्टात सिद्ध झालं आहे. अनिल परब, अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड आता रांगेत आहेत. त्यामुळं ‘आगे आगे देखो होता हैं क्या’ असं म्हणत सोमय्यांनी संकेत दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NIA झाली आता ‘ED’ची एन्ट्री, महाविकासआघाडी सरकारच्या अडचणीत वाढ?

News Desk

सारथी’ला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्याचा सरकारचा निर्णय

News Desk

शिवसेनला धक्का ! तृप्ती सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk