HW News Marathi
महाराष्ट्र

वयस्कर राज्यपालांसोबत कशी भाषा वापरतात? सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची केलेली आठवण यावरुन प्रचंड वाद झाला. यावरुन भाजप नेते किरि सोमय्या यांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. हिंदू धर्माच्या वारसाशी बात करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वयस्कर असलेल्या राज्यपाल यांच्याबाबत कशी भाषा वापरतात ? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे नाईट लाईफबाबत एवढ्या मिटिंग घेतात मात्र मंदिरबाबत लोकांच्या भावना समजत नाहीत का ? हा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे व्यवस्थेवर नियंत्रण राहिलेले नसल्याची टीका सोमय्यांनी केली. मुख्यमंत्र्यांचे कोणी ऐकत नाही आहे, मुख्यमंत्र्यांचे संतुलन राहिलेले नसल्याने त्यांना टेन्शन आल्याचे ते म्हणाले.अपेक्स रुग्णालयात व्हेंटीलेंटरवर असलेल्या ३८ पैकी १२ लोकांचे जीव धोक्याच्या पातळीवर आहेत. वीज पुरवठा बंद झाल्याने मुंबईत १२ हजार व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांपैकी किमान एक हजार रुग्णांचा जीव धोक्यात असूनस रकारने गंभीर नसल्याचे सोमय्या म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या… मकरसंक्रांतीला पतंग उडविण्यामागचे वैज्ञानिक कारण

News Desk

अतिवृष्टीतील मदत कार्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेऊन, NDRF तसेच इतर यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश

Aprna

फक्त सरकार विरोधात बोलण्यासाठी राणेंना केंद्राचा लाडू मिळाला, गुलाबराव पाटलांनी सुनावलं

News Desk