HW News Marathi
महाराष्ट्र

किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कराडमध्ये रेल्वेतून उतरवलं!

कराड। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे या आरोपांचे पुरावे गोळा करण्यासाठी आपण मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कारखान्यावर जाणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं होतं. त्यावर मुश्रीफ यांचे समर्थक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या कोल्हापुरात आले तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. या सर्व घडामोडी पाहता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना नोटीस पाठवली. त्यांनी सोमय्या यांना कोल्हापुरात दाखल होऊ नये, असा आदेश दिला. पण तो आदेश न जुमानता सोमय्या यांनी कोल्हापूरला जाण्याचा निर्णय कायम ठेवला.

पोलिसांनी सोमय्यांना पहाटे कराडमध्ये उतरवलं

भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कराडमध्ये उतरवलं. सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला निघाले होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमय्यांना पहाटे कराडमध्ये उतरवलं. आता सोमय्या कराड शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेणार आहेत.दुसरीकडे किरीट सोमय्यांच्या या पवित्र्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे सुद्धा आक्रमक झाले आहेत. त्यांनीही माध्यमांशी संवाद साधून आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला आहे.

हे घोटाळेबाज सरकार आहे

राज्य सरकारने माझ्या घरात पोलीस पाठवले आहेत. माला कोल्हापूरला जाऊ दिले जात नाहीये, असा दावा केलाय. तसेच मला कोणीही कितीही अडवले तरी कोल्हापूरला जाणारच असं ठामपणे सांगितलं आहे. हसन मुश्रीफ हादरले आहेत. मुश्रीफ यांनी भ्रष्टाचाराचे 98 कोटी रुपये आपल्या संस्थेत तसेच कारखान्यात गुंतवले आहेत. मी उद्याच कोल्हापुरात जाऊन कारखान्याची पाहणी करणार होतो. पण त्यांनी कोल्हापूरला 144 लावली. त्यानंतर ठाकरे यांनी माझा दौरा प्रतिबंधित केला आहे. तसेच वळसे पाटील यांनीही माझ्या घरात पोलीस पाठवले आहेत. पण हे घोटाळेबाज सरकार आहे. काही झाले तरी मी कोल्हापूरला जाणारच, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यासाठी आमचा विरोध – बाळासाहेब थोरात 

News Desk

महिला राखीव प्रवर्गातून तृतीय पंथीय अंजली पाटील विजयी

News Desk

संजय राऊतांच्या टीकेला भाजपच्या नेत्या चित्रा वाघांचं जोरदार प्रत्युत्तर!

News Desk