HW News Marathi
महाराष्ट्र

‘अजित पवारांमध्ये हिम्मत असेल तर….’ किरीट सोमैय्यांचं आव्हान!

पुणे | भाजप नेते किरीट सोमैय्या सध्या महाविकास आघाडी सरकारच्या मागे हाथ धुऊन लागले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. तेव्हा बोलताना त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिलं आहे. अजित पवार यांच्या मागे सध्या जरंडेश्वर कारखान्याप्रकारणी ईडीचं सावट आहे. यावर किरीट सोमैय्या यांनी त्यांना आव्हान केलं आहे.

हिम्मत असेल तर….

किरीट सोमैय्या यांनी पत्रकार परिषदेत अजित पवार यांना आव्हान दिलं आहे . ” हिम्मत असेल तर जरंडेश्वर प्रकरण बद्दल देखील बोला”, असं आव्हान त्यांनी अजित पवारांना दिलं आहे. किरीट सोमैय्या सध्या महाविकास विकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडीला तक्रार करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करत आहेत. तेव्हा त्यांनी अजित पवारांना आव्हान दिलं आहे.

ठाकरे सरकारची घोटाळा इलेव्हन

याबाबत किरीट सोमय्या म्हणाले, “ठाकरे सरकारची घोटाळा इलेव्हन. शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी अनधिकृत बांधकाम केलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वसुली कांडात ईडीने पुरावे दिले. परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट, परिवहन विभागात चौकशी, शिवसेना खासदार भावना गवळी यांनी बँकेचे पैसे लाटले, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी गाळे ढापले, माजी मंत्री रवींद्र वायकर आणि रश्मी ठाकरेंनी मिळून जमीन घोटाळा केला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची एसआरएचा भूखंड प्रकरणी चौकशी सुरु, छगन भुजबळांवर आरोप आहेत. शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी UAEमध्ये पैसे पाठवले तर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगला बांधला आणि पाडला”, असं ते म्हणाले आहेत.

अनिल परब यांना ईडीची नोटीस

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची नुकतीच सांगता झाली आहे. याआधी राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात चांगलेच वादंग माजले होते. या सर्व गोष्टींवर पडदा पडत असतानाच आता परब यांना ईडीने नोटीस दिली आहे.

शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता ईडीने परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस जारी केली आहे. त्यांना ईडीने येत्या मंगळावरी म्हणजे ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.

भावना गवळी यानं ईडीकडून नोटीस

शिवसेना नेते अनिल परब यांच्या ईडी नोटीसची चर्चा सुरु असतानाच आणखी एका शिवसेना नेत्यावर ईडीने धाडी टाकल्या आहेत. शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थांवर ईडीने धाडी टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने भावना गवळी यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याची तक्रार ईडीकडे केली होती. ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकल्या. खासदार भावना गवळी यांच्याविरोधात असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने धाडसत्र सुरू असल्याची माहिती आहे. ईडीच्या अनेक टीम वाशिममध्ये दाखल झाल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘१२वीच्या गुणांवरच पदवीचे प्रवेश’, CET परीक्षा होणार नसल्याचं उदय सामंतांचं स्पष्टीकरण!

News Desk

“कोणत्याही ST कामगाराला कामावर येण्यापासून अडवू नका!” – अनिल परब

News Desk

पक्ष बांधणीसाठी राज ठाकरेंचा दौरा 

News Desk