HW News Marathi
महाराष्ट्र

“RSS चं प्रशिक्षण घेणारे अधिवेशनात ब्ल्यू फिल्म्स पाहतात, शिकण्यासारखं काय?”, बड्या नेत्याची टीका

नवी दिल्ली । “मला आरएसएसची (RSS) सोबत नको आहे. आरएसएसच्या शाखांमध्ये काय शिकवलं जातं हे पाहिलंय. अधिवेशन सुरु असताना ब्ल्यू फिल्म्स पाहत असतात. हे शिकवण्यासाठी मला शाखेत जाण्याची गरज आहे का?”, असा सवाल करत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल सेक्युलरचे नेते कुमारस्वामी यांनी खळबळ उडवून दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी कुमारस्वामी यांना संघाच्या शाखेला भेट देण्यासाठी निमंत्रित केलं आहे. याबाबत प्रश्न विचारला असता कुमारस्वामी यांनी ही टीका केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये शिकण्यासारखं काही नसून तिथून प्रशिक्षण घेतलेले लोक विधानसभेत ब्ल्यू फिल्म्स पाहत असतात. हे शिकण्यासाठी मी तिथे (संघाच्या शाखेत) जाण्याची आवश्यकता आहे का? असा सवाल कुमारस्वामी यांनी केला आहे. त्यापुढेही ते म्हणाले की, “मला शाखेची गरज नाही. संघाच्या शाखेकडून जे शिकायचं होतं ते मी आधीच गरीबांच्या शाखेकडून शिकलो आहे. त्यामुळे त्यांच्या शाखेत शिकण्यासारखं काहीच नाही.”

नेमकं काय घडलं होतं?

२०१२ साली भाजपचे तीन मंत्री विधानसभेत अधिवेशनादरम्यान मोबाइलमध्ये पॉर्न व्हिडीओ पाहताना दिसून आले होते. या प्रकारानंतर मोठा गदारोळ झाला जाता. परिणामी या तुम्ही मंत्र्यांना राजीनामाही द्यायला लागला होता. हाच संदर्भ देत कुमार स्वामी यांनी भाजप आणि आरएसएसला डिवचलं आहे. दरम्यान, या विधानामुळे आता भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबासाहेब पुरंदरेंचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात कराण्याची फाईल ५ तास पडून होती? पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Aprna

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून वेगळा विचार सुरू !

News Desk

दुर्दैवाने महाराष्ट्रात ब्लू फ्लॅगचा अभिमान बाळगावा असा एकही समुद्रकाठी नाही, सत्यजित तांबेंची आदित्य ठाकरेंकडे नाराजी

News Desk